‘जेडीआयईटी’मध्ये वीज ट्रान्सफार्मर देखभाल व संरक्षणावर व्याख्यान
By admin | Published: May 7, 2017 01:04 AM2017-05-07T01:04:58+5:302017-05-07T01:04:58+5:30
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रीकल अभियांत्रिकीतील स्टुडंट असोसिएशन आॅफ विद्युत इंजिनिअरिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रीकल अभियांत्रिकीतील स्टुडंट असोसिएशन आॅफ विद्युत इंजिनिअरिंग या विद्यार्थी क्लबतर्फे वितरण ट्रान्सफार्मरची प्रणाली देखभाल आणि संरक्षणावर व्याख्यात घेण्यात आले. विद्युत कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजीव भोयर हे मार्गदर्शक म्हणून लाभले होते.
ट्रान्सफार्मरचे विविध भाग आणि त्याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. ट्रान्सफार्मरचे विविध प्रकार आणि गरजेनुसार त्याची निवड करणे यावर विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आलीे. ट्रान्सफार्मरचे नियमित परीक्षण करून त्यातील त्रुटी दूर केल्या जाऊ शकतात, असे अभियंता राजीव भोयर यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी इलेक्ट्रीकल अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख डॉ. पंकज पंडीत, स्टुडंट असोसिएशनचे समन्वयक प्रा. सारंग खडतरे, प्रा. गुरूपाल गायधने, प्रा. विद्याशेकर, प्रा. अनुराग बोरखडे, प्रा. अक्षय शिरभाते, प्रा. आकाश गोफणे आदी उपस्थित होते.
व्याख्यानाच्या यशस्वी आयोजनासाठी नेहा भोंगाडे, हेमंत गुल्हाने, गितेश बानोत, धनंजय वाघचोरी, रश्मी राठोड, आयुष लोहिया, कुणाल किन्नेकर, संदीप ठोंबरे आदींनी पुढाकार घेतला. संचालन व आभार प्रियांका भोसले हिने मानले. व्याख्यानाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संस्थेचे सचिव किशोर दर्डा, प्राचार्य डॉ. अविनाश कोल्हटकर यांनी आयोजकांचे कौतुक केले.