लॉर्ड बुद्धा व जमात-ए-इस्लामी हिंदच्या संयोजनात व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 11:32 PM2017-12-02T23:32:25+5:302017-12-02T23:33:01+5:30
येथील आझाद मैदानात आयोजित स्मृती पर्वात शुक्रवारी लॉर्ड बुद्धा आणि जमात-ए-इस्लामी हिंदच्या संयोजनात व्याख्यान झाले. लॉर्ड बुद्धाच्या संयोजनातील व्याख्यानाचा विषय ‘संवैधानिक भारत राष्ट्रनिर्माण काळाची गरज’ हा होता. भैयासाहेब खैरकार व्याख्याते होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील आझाद मैदानात आयोजित स्मृती पर्वात शुक्रवारी लॉर्ड बुद्धा आणि जमात-ए-इस्लामी हिंदच्या संयोजनात व्याख्यान झाले.
लॉर्ड बुद्धाच्या संयोजनातील व्याख्यानाचा विषय ‘संवैधानिक भारत राष्ट्रनिर्माण काळाची गरज’ हा होता. भैयासाहेब खैरकार व्याख्याते होते. जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे अध्यक्षस्थानी होत्या.
भैयासाहेब खैरकार म्हणाले, संवैधानिक पद धारण केलेला प्रत्येक अधिकारी तसेच पदाधिकाऱ्याची कृती संविधानाला साजेशीच असली पाहिजे. धर्मनिरपेक्षता, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या मूल्याचे तंतोतंत पालन त्यांनी केले तरच संवैधानिक भारत खऱ्या अर्थाने निर्माण होईल. जात, धर्म, भाषा व प्रांत यावरून कुठलाही भेदभाव त्यांच्याकडून होऊ नये, अशी रास्त अपेक्षा सामान्य नागरिकांची आहे. ही प्रक्रिया ज्या दिवशी सुरू होईल तेव्हाच समता प्रस्थापित होईल आणि भारतात लोकशाही नांदायला लागेल, असे ते म्हणाले.
अध्यक्षीय मार्गदर्शनात माधुरी आडे म्हणाल्या, संविधानाने स्त्रियांना दिलेले अधिकार व्यापक आहेत. मी आज केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानामुळेच एवढ्या मोठ्या पदावर विराजमान होऊ शकले.
यावेळी बाळासाहेब गावंडे यांनीही विचार मांडले. प्रसंगी मंचावर के.एस. नाईक, बलवंत गजभिये, व्ही.एस. आठवले, प्रकाश भस्मे, पुरुषोत्तम भजगवरे, चंद्रबोधी घायवटे, संजय मानकर आदी उपस्थित होते.
जमात-ए-इस्लामी हिंद
जमात-ए-इस्लामी हिंदच्या संयोजनात ‘पैगंबर मोहम्मद यांचे मानवतेवरील उपकार’ या विषयावर व्याख्यान झाले. अब्दुल मुजीब मोमीन साहेब उदगीर हे व्याख्याते होते. ते म्हणाले, इस्लामचे तत्त्व हे केवळ मुस्लीम धर्मीयांसाठीच नाही. प्रत्येकांनीच इस्मालचे विचार अंगिकारण्याची गरज आहे. पवित्र कुरानमध्ये अतिशय चांगल्या गोष्टी नमूद करून ठेवल्या आहेत. मानवी कल्याणासाठी याचा उपयोग होऊ शकतो, असे ते म्हणाले.
प्रास्ताविक प्रा. वसीम खान, संचालन प्रा. सैयद मोहसीन, आभार मो. शोएब सहीर यांनी मानले. मंचावर मन्सूर एजाज जोश, जियाउद्दिन भाई, रियाज हुसेन सिद्दिकी, डॉ. अबरार अहमद खान, शेख महेबूब आलम, फरखान अहमद खान, वजिदउल्ला खान, नईन खान, काझी रिजवान, अॅड. इमरान देशमुख, जुनेद खान, मो. अकबर शाहीद अलदाज, मिर्झा अवतार बेग, आजिमुर्रहमान, राहिल बेग आदी उपस्थित होते. प्रारंभी सदप पैकर या विद्यार्थिनीने पैगंबर मोहम्मद साहेबांवरील सुरेश भट यांची मराठीतील कविता सादर केली.
व्याख्यानप्रसंगी स्मृती पर्वाचे समन्वयक ज्ञानेश्वर गोरे, कवडुजी नगराळे, आनंद गायकवाड, संजय बोरकर, सुनील वासनिक, सुनीता काळे, माया गोबरे, विशाखा गजभिये, दीपक नगराळे, धनंजय गायकवाड आदी उपस्थित होते.