वीज कंपनीकडूनच मिळतील एलईडी बल्ब

By admin | Published: October 17, 2015 12:33 AM2015-10-17T00:33:27+5:302015-10-17T00:33:27+5:30

ग्राहकांना विजेचे बील कमी यावे, या हेतुने वीज कंपनीने पर्यावरणपूरक आणि स्वस्त असे एलईडी बल्ब वितरणाचा उपक्रम हाती घेतला आहे.

LED bulb will be available from the electricity company | वीज कंपनीकडूनच मिळतील एलईडी बल्ब

वीज कंपनीकडूनच मिळतील एलईडी बल्ब

Next

रविवारपासून वितरण सुरू : घरगुती विद्युत ग्राहकांनाच मिळेल लाभ
यवतमाळ : ग्राहकांना विजेचे बील कमी यावे, या हेतुने वीज कंपनीने पर्यावरणपूरक आणि स्वस्त असे एलईडी बल्ब वितरणाचा उपक्रम हाती घेतला आहे. यवतमाळ येथे रविवार, १८ आॅक्टोबरपासून या उपक्रमाला प्रारंभ होणार आहे.
जिल्ह्यातील सरसकटक घरगुती विद्युत ग्राहक या योजनेचा लाभ घेऊ शकतील. यासाठी काही निकष ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार या योजनेत सहभागी होऊन बल्ब घेऊ इच्छिणारा ग्राहक हा घरगुतीच असावा, व्यावसायिक वापरासाठी हे बल्ब मिळणार नाहीत. चालू महिन्याचे विजेचे बिल भरलेले असावे, विजेचे बिल थकित असणाऱ्या ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. एका बिलावर जास्तीत जास्त चार एलईडी बल्ब (सात वॅटचे) मिळतील, त्यासाठी प्रती बल्ब शंभर रूपये किंमत असेल. ज्यांना एकाच वेळी शंभर रुपये देणे शक्य नसेल त्यांना प्रत्येक बल्बसाठी सुरूवातीला केवळ १० रुपये म्हणजे चार बल्ब घ्यावयाचे असल्यास ४० रुपये रोख भरावे लागेल. त्यानंतर उर्वरित रक्कम महिनेवारी पद्धतीने (ईएमआय) वीज बिलात लागून येईल.
महावितरणने हा बल्ब वितरण उपक्रम राबविण्यासाठी खासगी कंपनीसोबत करार केला आहे. त्यानुसार ही कंपनी संपूर्ण महाराष्ट्रात बल्ब वितरित करीत आहे. बाजारभावापेक्षा अतिशय कमी किमतीत हे बल्ब ग्राहकांना मिळणार आहे. शिवाय परंपरागत बल्बच्या तुलनेत केवळ सात वॅटचा बल्ब असून त्याचा प्रकाश मात्र साध्या बल्बच्या तुलनेत खूप जास्त राहणार आहे. हे बल्ब ऊर्जा उत्सर्जनसुद्धा कमी करणारे आहेत.
येथील वीज कंपनीच्या बसस्थानकाजवळील मुख्य कार्यालयातील बॅडमिंटर हॉलमध्ये रविवारी या उपक्रमाला प्रारंभ होत आहे. या कार्यक्रमातच वीज ग्राहकांना बल्ब देण्यात येणार आहे. वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: LED bulb will be available from the electricity company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.