ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे पाणी ब्राह्मणगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने गहू, हळद आणि ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले

By admin | Published: April 9, 2017 12:53 AM2017-04-09T00:53:25+5:302017-04-09T00:53:25+5:30

शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात राज्यात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या पुष्पवंती अर्थात पुसदनगरीत

The left canal water of the Upper Penganga Project came under the farmers' farm in Brahman Nagar, causing huge losses in wheat, turmeric and sugarcane crops. | ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे पाणी ब्राह्मणगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने गहू, हळद आणि ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले

ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे पाणी ब्राह्मणगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने गहू, हळद आणि ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले

Next

३० हजार ग्रंथसंपदा : देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालय
पुसद : शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात राज्यात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या पुष्पवंती अर्थात पुसदनगरीत दुर्मिळ पुस्तकांचा अनमोल खजाना आहे. शतकोत्तरी देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालयाची ग्रंथसंपदा बघितली की शहराची सांस्कृतिक श्रीमंती लक्षात येते. या वाचनालयाने शहराचा सांस्कृतिक वारसा जोपासत वाचक चळवळ गतीमान करण्याचा प्रयत्न केला आहे.
पुसद शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या वाचनालयाची स्थापना १८८६ साली झाली. नेटीव्ह लायब्ररी म्हणून ब्रिटिशकाळात ओळखले जात होते. त्यानंतर १९८६ साली सार्वजनिक वाचनालय असे नामाभिदान करण्यात आले. तत्कालिन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या निधीतून या वाचनालयाला पाच लाख रुपये देण्यात आले. पुसद येथील स्वातंत्र्य संग्राम सैनिक शंकरराव सरनाईक यांचे नाव या वाचनालयाला देण्याची इच्छा सुधाकरराव नाईकांनी व्यक्त केली. तत्कालिन अध्यक्ष मधुकरराव देशपांडे यांनी तत्काळ सार्वजनिक वाचनालयाचे नामाभिदान देशभक्त शंकरराव सरनाईक वाचनालय, असे करण्यात आले.
या वाचनालयात ३० हजार ग्रंथसंपदा असून दोन हजार सभासद आहे. या वाचनालयात मात्र सायंकाळी वाचकांची गर्दी असते. दररोज पुस्तकांची देवाण-घेवाण सुरू असते. प्रशस्त अशा या सार्वजनिक वाचनालयात विविध कक्ष आहे. यात स्पर्धा परीक्षेचा कक्ष सर्वांचे लक्ष वेधून घेतो. या अभ्यासिकेला १९९८ मध्ये सुरुवात केली. १२ तास दररोज उघडे असते. येथे अभ्यास करणारे २० जण शासकीय सेवेत लागले आहेत.
ग्रंथालयाचे अध्यक्ष योगेश राजे, उपाध्यक्ष अनघा गडम, सचिव चंद्रकांत गजबी, कोषाध्यक्ष रवी देशपांडे आणि संचालक मंडळाच्या प्रयत्नाने वाचनालय वाचन संस्कृती वृद्धिंगत करीत आहे. या वाचनालयात असलेले २० गं्रथ अतिशय दुर्मिळ आहे. या दुर्मिळ ग्रंथांची माहिती शासनाला दिल्याचे ग्रंथपाल नागेश गांधे यांनी सांगितले.
वाचनालयात विविध उपक्रम
देशभक्त शंकरराव सरनाईक वाचनाल्याच्यावतीने वर्षभर विविध उपक्रम राबविले जाते. त्यातील कीर्तन महोत्सव आणि चैत्र महोत्सव पुसदकरांसाठी पर्वणी असते. आतापर्यंत झालेल्या या महोत्सवात राज्यातील विविध वक्त्यांनी हजेरी लावली. (कार्यालय चमू)

पुसद शहरात वाचक चळवळ गतिमान करण्याचा प्रयत्न
फिरते वाचनालय
देशभक्त शंकरराव सरनाईक वाचनालयाच्यावतीने फिरते वाचनालय राबविले जाते. एका व्हॅनद्वारे पुस्तके वाचकांच्या घरापर्यंत पोहोचविली जातात. याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आबालवृद्ध या फिरत्या वाचनालयाचा लाभ घेत आहेत.

अलिकडे वाचन संस्कृती लुप्त होत आहे. तरुणाईला वाचनाकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शासकीयस्तरावर उदासीनता असली तरी आम्ही शहरात वाचन संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न करीत आहे.
- योगेश राजे, अध्यक्ष

Web Title: The left canal water of the Upper Penganga Project came under the farmers' farm in Brahman Nagar, causing huge losses in wheat, turmeric and sugarcane crops.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.