दिग्रस येथे कायदेविषयक जनजागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:33 PM2017-11-22T23:33:30+5:302017-11-22T23:34:23+5:30
महाराष्ट्र विधीसेवा समिती व स्थानिक दिवाणी न्यायालयातर्फे आयोजित कायदेविषयक जनजागृती अभियानाचा समारोप मंगळवारी रॅलीद्वारे करण्यात आला.
ऑनलाईन लोकमत
दिग्रस : महाराष्ट्र विधीसेवा समिती व स्थानिक दिवाणी न्यायालयातर्फे आयोजित कायदेविषयक जनजागृती अभियानाचा समारोप मंगळवारी रॅलीद्वारे करण्यात आला. न्यायालय परिसरात न्यायाधीश ए.एन. पठाण यांनी झेंडी दाखवून या रॅलीला प्रारंभ केला.
हातात फलक घेऊन व घोषणा देत विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येत या रॅलीत सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरुन या रॅलीचा न्यायालय परिसरातच समारोप झाला. या रॅलीत माधुरी देशकर, अॅड. विक्रम शिंदे, अॅड. अजय पवार, अॅड. आरती सवणे, अॅड. मोहसीन मिर्झा, अॅड. मीना भगत, शरद बावीस्कर आदी न्यायालयीन कर्मचारी व वकिलांनी पथनाट्य सादर केले. विधीसेवा समितीच्यावतीने दहा दिवस कायदेविषयक जनजागृती अभियान राबविण्यात आले होते. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या रॅलीमध्ये दिवाणी न्यायाधीश ए.एन. पठाण, सहदिवाणी न्यायाधीश एस.वाय. कदम, एस.जी.परवरे, प्राचार्य डॉ. संतोष आगरकर, विधी सेवा समितीचे सदस्य प्रा. मतीन खान, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. दत्ता खंडारे, उपाध्यक्ष अॅड. मोहसीन मिर्झा, अॅड. आरती सवणे, प्राचार्य हाजी एजाजोद्दीन, किशोर कांंबळे, यशवंत सुर्वे, रामदास पद्मावार, मजहर अहमद खान, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नाईक, बाबाराव पवार, प्रा. प्रल्हाद डवरे, अॅड. विजय राठोड, अॅड. गणेश दुर्गे, अॅड. राहील खान, अॅड. इरफान चव्हाण, अॅड. अजय पवार, अॅड. संजय राठोड, अॅड. पंकज शेरे, अॅड. ज्ञानेश्वर जाबरसकर, अॅड. शरद शिंदे, अधीक्षक साबीर हुसेन, आर.डी. बंड, मोहंमद शकील यांच्यासह शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, वकील, न्यायालयातील कर्मचारी सहभागी झाले होते.