विद्यार्थ्यांना दिले नागरी सुरक्षेचे धडे
By admin | Published: December 23, 2015 03:23 AM2015-12-23T03:23:05+5:302015-12-23T03:23:05+5:30
टार्गेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सद्वारे (टीडीआरएफ) नेहरू स्टेडियम येथे एनसीसीच्या विद्यार्थ्यांकरिता नागरी सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यासाठी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.
यवतमाळ : टार्गेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सद्वारे (टीडीआरएफ) नेहरू स्टेडियम येथे एनसीसीच्या विद्यार्थ्यांकरिता नागरी सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यासाठी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.
या शिबिरात राष्ट्रीय छात्र सेनेचे ४०० विद्यार्थी सहभागी झाले. कवायत, शस्त्र हाताळणी, मॅप रिडिंग, वनभ्रमण आदींचे प्रशिक्षण देण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन आणि नागरी सुरक्षा, शोध, बचाव, संकटात सापडलेल्या नागरिकांना वाचविणे हे विषयसुद्धा शिकविण्यात आले. टीडीआरएफचे संचालक हरिश्चंद्र राठोड यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी उमरखेड तालुक्यात बोरवेलच्या खड्ड्यात पडलेल्या मुलाला १४ तासांच्या प्रयत्नानंतर कसे बाहेर काढण्यात आले, याची चित्रफित शिबिरात दाखविण्यात आली.
४७ महाराष्ट्र बटालियनचे कमान अधिकारी कर्नल चव्हाण यांच्या मार्गदर्शनात, कॅप्टन खडतकर, सुभेदार मेजर सोळंकी, सुभेदार सिंग, सुभेदार कंकाळ, पृथ्वीराज चव्हाण, रोशन राठोड, प्रतीक काळसपे, अभिषेक राजहंस आदी शिबिरात उपस्थित होते.
(स्थानिक प्रतिनिधी)