उद्योगांचे प्रस्ताव पाठवा सर्वतोपरी मदत करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 11:24 PM2018-04-13T23:24:42+5:302018-04-13T23:24:42+5:30

या जिल्ह्यात विविध उद्योग सुरू करण्यास वाव आहे. त्यासाठी आम्ही काही सूचविण्यापेक्षा स्थानिक गरजा लक्षात घेऊन आपण प्रस्ताव पाठवावेत. त्यावर चर्चा करून आम्ही शासकीय स्तराहून सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत,....

Let the proposals of the industry be a great help | उद्योगांचे प्रस्ताव पाठवा सर्वतोपरी मदत करू

उद्योगांचे प्रस्ताव पाठवा सर्वतोपरी मदत करू

Next
ठळक मुद्देएस.आर. लोंढे : समता पर्वात उद्योजक मार्गदर्शन परिषद, कविसंमेलन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : या जिल्ह्यात विविध उद्योग सुरू करण्यास वाव आहे. त्यासाठी आम्ही काही सूचविण्यापेक्षा स्थानिक गरजा लक्षात घेऊन आपण प्रस्ताव पाठवावेत. त्यावर चर्चा करून आम्ही शासकीय स्तराहून सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत, असे प्रतिपादन उद्योग अधिकारी एस. आर. लोंढे यांनी केले.
समता पर्वाचा एक भाग म्हणून स्थानिक स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा श्रोतृगृहात दुपारी उद्योजक मार्गदर्शन परिषद व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता पर्वाचे अध्यक्ष सिद्धार्थ भवरे होते. तर मार्गदर्शक म्हणून जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर एस. एस. मुद्दमवार, वर्ल्ड व्हिजन यवतमाळचे अधिकारी राजेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते. समता पर्वाचे सचिव दीपक नगराळे, सुधीर बनसोड, राजकुमार बेलसरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख मार्गदर्शक लोंढे म्हणाले, महाराष्ट्रात अहमदनगर आणि यवतमाळ हे दोन जिल्हे सर्व बाबतीत सारखे आणि मागासलेले आहेत. या ठिकाणी विविध उद्योग सुरू करण्यास भरपूर वाव आहे. अध्यक्ष सिद्धार्थ भवरे यांनी या परिषदेच्या अल्प प्रतिसादाबद्दल खंत व्यक्त केली. बाबासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असणाऱ्या सुशिक्षितांबद्दल त्यांनी हळहळ व्यक्त केली. सर्वच क्षेत्रात बांधीलकी स्वीकारणारी माणसे यशस्वी होतातच. आपणही उद्योगासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी अध्यक्ष अशोक वानखडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अंकुश वाकडे यांनी केले. तर राजकुमार मोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाची जागा बदलल्यामुळे उद्योजक मार्गदर्शन परिषदेला अपेक्षित श्रोते न मिळाल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. मात्र समता पर्वातील विविध प्रबोधनपर कार्यक्रमाला समाजबांधव मोठ्या संख्येने हजेरी लावत आहे. नव्या विचारांची शिदोरी घेऊन जाण्यासाठी समता मैदानावर गर्दी होत आहे.
यावेळी समतापर्वात झालेल्या कवी संमेलनात एकापेक्षा एक दर्जेदार कविता सादर करण्यात आल्या. संदीप बेले, धनराज हलबले, सागर बेले, चंद्रमणी कवाडे, अर्चनाताई खोब्रागडे, धैर्यशील ताकसांडे, प्रकाश खरतडे, जयकुमार वानखेडे आदींनी कविता सादर केल्या. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी भारत लढे होते. सूत्रसंचालन प्रा. हर्षवर्धन तायडे यांनी केले. तर नारायण स्थूल यांनी आभार मानले.

Web Title: Let the proposals of the industry be a great help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.