सैनिकांना मालमत्ता करातून सूट द्या
By Admin | Published: July 5, 2017 12:12 AM2017-07-05T00:12:32+5:302017-07-05T00:12:32+5:30
संरक्षण दलातील आजी-माजी सैनिक आणि शहीद तसेच दिवंगत सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करातून सवलत देण्यात यावी...
संजय राठोड : निर्णयात अंशत: बदलासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : संरक्षण दलातील आजी-माजी सैनिक आणि शहीद तसेच दिवंगत सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करातून सवलत देण्यात यावी, अशी मागणी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.
संरक्षण दलात उत्कृष्ट कामगिरी करून शौर्य पदक प्राप्त सैनिक तसेच शहीद आणि दिवंगत सैनिकांच्या विधवांना त्यांच्या नावावर असलेल्या एका मालमत्तेच्या मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय राज्य शासनाने गतवर्षी घेतला होता. या निर्णयामुळे संरक्षण दलात काम करणाऱ्या परंतु, शौर्य पदक प्राप्त न केलेल्या सैनिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
संरक्षण दलातील सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी ही बाब महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या निदर्शनास आणून दिली. याची दखल घेत ना. संजय राठोड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून संरक्षण दलातील शौर्यपदक प्राप्त सैनिक व माजी सैनिकांच्या कुटुंबीयाला मालमत्ता करातून सूट देण्याच्या निर्णयात अंशत: बदल करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.