आधी प्रेमाने सांगू, नंतर शिवसेना स्टाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 10:00 PM2019-06-13T22:00:38+5:302019-06-13T22:02:11+5:30

जनतेने आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडले आहे. त्या जनतेचा प्रथम आदर करतो. जनता आपल्या कामासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवते. अधिकाऱ्यांनी जनतेच्या कामांना प्राधान्य द्यावे. अन्यथा आपल्याकडे तक्रार आल्यास आधी प्रेमाने आणि नंतर शिवसेना स्टाईलने अधिकारी, कर्मचाऱ्यांना उत्तर दिले जाईल, असा इशारा खासदार हेमंत पाटील यांनी दिला.

Let's say love first, then Shiv Sena style | आधी प्रेमाने सांगू, नंतर शिवसेना स्टाईल

आधी प्रेमाने सांगू, नंतर शिवसेना स्टाईल

Next
ठळक मुद्देखासदारांचा इशारा : महागाव येथे रसाळी कार्यक्रमात टोलेबाजी

लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : जनतेने आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडले आहे. त्या जनतेचा प्रथम आदर करतो. जनता आपल्या कामासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवते. अधिकाऱ्यांनी जनतेच्या कामांना प्राधान्य द्यावे. अन्यथा आपल्याकडे तक्रार आल्यास आधी प्रेमाने आणि नंतर शिवसेना स्टाईलने अधिकारी, कर्मचाऱ्यांना उत्तर दिले जाईल, असा इशारा खासदार हेमंत पाटील यांनी दिला.
येथे आयोजित जाहीर सत्कार व रस पोळी जेवणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. तालुक्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प, शेतकऱ्यांना कर्ज वाटप, घरकुलाचे रखडलेले हप्ते, कृषीपंपांना वीज पुरवठा, अशा किती तरी मागण्याचे निवेदन लोकांनी खासदार पाटील यांना दिले. खासदार पाटील यांनी प्रशासनाकडून तालुक्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अनुशेष जाणून घेतला. नंतर आमदारांच्या मदतीने लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या तालुक्यातील अनुशेष दूर करण्याची ग्वाही दिली.
दर तीन महिन्याला जनता दरबार, तालुका तेथे जनसंपर्क कार्यालय राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांना सांगितलेल्या कामाचा आढावा जनता दरबारातून घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य महागाव-उमरखेड विधानसभा मतदार संघाने दिले. याची आपण कायम जाणीव ठेवणार असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले. आमदार राजेंद्र नजरधने, शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, डॉ.विश्वनाथ विणकरे, भाविक भगत, जगदीश नरवाडे, रामराव नरवाडे, समाधान ठाकरे, प्रमोद भरवाडे, सुदाम खंदारे, सुनील नरवाडे, अशोक तुमवार, लक्ष्मीबाई पारवेकर, सीमा जाधव, उज्वला भारती, नीलू सोयाम आदी मंचावर उपस्थित होत्या.

Web Title: Let's say love first, then Shiv Sena style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.