कोट्यवधी खर्चूनही पातळी घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 09:55 PM2019-07-28T21:55:58+5:302019-07-28T21:56:25+5:30

सिंचनाच्या माध्यमातून कायापालट करण्यासाठी धरण हा एक पर्याय असला तरी त्यासाठी फार मोठा निधी आणि जमिनीचेही अधिग्रहण करावे लागते. यातील शॉर्टकट म्हणून जलयुक्त शिवाराची कल्पना पुढे आली. ही योजना उदात्त असली तरी या योजनेत काम करताना अनेक ठिकाणी गुणवत्ताच पाळल्या गेली नाही, असेही आरोप झाले आहेत.

Levels fell, even with billions spent | कोट्यवधी खर्चूनही पातळी घसरली

कोट्यवधी खर्चूनही पातळी घसरली

googlenewsNext
ठळक मुद्देजलयुक्त शिवार तहानले : ७०० गावे जलयुक्तच्या प्रतीक्षेत, ५० हजार कामे प्रस्तावित

रूपेश उत्तरवार। लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सिंचनाच्या माध्यमातून कायापालट करण्यासाठी धरण हा एक पर्याय असला तरी त्यासाठी फार मोठा निधी आणि जमिनीचेही अधिग्रहण करावे लागते. यातील शॉर्टकट म्हणून जलयुक्त शिवाराची कल्पना पुढे आली. ही योजना उदात्त असली तरी या योजनेत काम करताना अनेक ठिकाणी गुणवत्ताच पाळल्या गेली नाही, असेही आरोप झाले आहेत. तर अनेक ठिकाणी ही योजना चांगल्या पद्धतीने राबविली गेली आहे.
गणेशवाडीत टँकरच लागले नाही
गत चार वर्षांमध्ये जिल्ह्यातील १३३७ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली. यातून ४८ हजार ८४४ कामे पार पडली. यामुळे एक लाख १४ हजार २४९ हेक्टरवर सिंचन वाढले. तर एक लाख २९ हजार ३५८ टीएमसी पाणी संचयीत करण्यात आले. शासकीय अहवालानुसार यामुळे भूजलाच्या स्रोतात एक मीटरने वाढ नोंदविण्यात आली. गणेशवाडीत जलयुक्त शिवार राबविण्यापूर्वी दरवर्षी पावसाळ्यातही टँकर लागत होते. आता या ठिकाणी टँकर लागत नाही. हा बदल या ठिकाणी पहायला मिळाला. संरक्षित सिंचनात भर पडली. याला दुष्काळी स्थिती अपवाद आहे.
 

Web Title: Levels fell, even with billions spent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.