शाळेच्या संस्कारामुळे आयुष्याची जडणघडण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:27 AM2021-07-04T04:27:58+5:302021-07-04T04:27:58+5:30
डॉ. पवार यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते म्हणाले, दिवंगत लोकनेते देवराव पाटील चोंढीकर यांनी स्थापन केलेल्या शिवाजी ...
डॉ. पवार यांनी शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते म्हणाले, दिवंगत लोकनेते देवराव पाटील चोंढीकर यांनी स्थापन केलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेने अखंड ज्ञानदानाचे स्वप्न पूर्णत्वास नेताना विद्यमान अध्यक्ष विजयराव पाटील चोंढीकर व सचिव अनिरूद्ध पाटील चोंढीकर यांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य अधिक सक्षमतेने चालविले आहे. त्याचीच परिणती म्हणून माझ्यासारखे ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन समाज ॠण फेडण्यासाठी तयार झाले.
तालुक्यातील भंडारी गावात सामान्य कुटुंबात माझा जन्म झाला. दहावीपर्यंतचे शिक्षण या शाळेत झाले. येथील शिक्षकांनी मला दिलेली ज्ञानाची शिदोरी अखंडपणे सोबत आहे. त्या आधारावर साहित्याची ओढ लागली आणि त्यातूनच ‘मरणासन्न हयातीची आर्जव’ हा कविता संग्रह प्रकाशित झाल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. तत्कालीन शिक्षक वैरागडे, ताई उपलेंचवार, पंजाबराव सुरोशे, पी.पी. कदम, विजय उंचेकर, सुनीता ठाकरे यांच्या आठवणी त्यांनी कथन केल्या. डाॅ. चंदू पवार सध्या पुलगाव येथे मेडिकल ऑफीसर म्हणून कार्यरत आहेत.
यावेळी प्राचार्य विजय उंचेकर, उपमुख्याध्यापक एन.एस. मंदाडे, रविकुमार मस्के, अतिष पत्रे, शिवाजीराव ठाकरे उपस्थित होते. त्यांनीही मनोगत व्यक्त केले.