खरबडा येथे वीज पडून पाच जनावरे ठार; वादळी वाऱ्यामुळे ४० घरांची छपरे उडाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 03:51 PM2020-03-29T15:51:21+5:302020-03-29T15:51:27+5:30
वणी (यवतमाळ) : झरी तालुक्यातील खरबडा येथे वीज कोसळून पाच जनावरे जागीच ठार झाली. ही घटना शनिवारी रात्री १० ...
वणी (यवतमाळ) : झरी तालुक्यातील खरबडा येथे वीज कोसळून पाच जनावरे जागीच ठार झाली. ही घटना शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. सदर जनावरे संतोष नागरतवार व हनमंत्तू कोत्तावार या शेतकºयांच्या मालकीची होती. सदर घटनेचा रविवारी तलाठ्याने पंचनामा केला.
केळापूर तालुक्यात शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अचानक आलेले वादळाने चांगलेच तांडव घातले. यामुळे तालुक्यातील खैरगाव(खु) व धारणा या दोन गावांत मोठे नुकसान झाले. खैरगावातील सुमारे ४० घरांना वादळाचा चांगलाच तडाखा बसला. अनेक घरांवरील छपरे उडून गेलीत. झाडे आणि विजेचे पोल उन्मळून पडले. त्यामुळे गावातील व परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला. वादळामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. .धारणा गावातील पाच ते सहा घरावरील छपरे उडून गेली. रविवारी दुपारनंतर महसूल विभागाची चमू खैरगावात सर्वेक्षणासाठी पोहचली होती.