वसंतराव नाईक यांच्या समाधीवर कोसळली वीज, समाधीस्थळाचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 10:24 AM2021-03-20T10:24:16+5:302021-03-20T10:28:17+5:30
Yawatmal News Wardha पुसद तालुक्यातील गहुली येथील महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक व राजुसिंग नाईक यांच्या समाधी स्थळावर गुरुवारी रात्री अचानक विज कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे .
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पुसद तालुक्यातील ग्रामिण भागासह शहरी भागात अवकाळी पावसाने धुमाकुळ घातला आहे. तालुक्यात अवकाळी पावसासह विज कोसळन्याची घटना घडली आहे. तालुक्यातील गहुली येथील महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक व राजुसिंग नाईक यांच्या समाधी स्थळावर गुरुवारी रात्री अचानक विज कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे .
वीज पडल्याने बांधकाच्या अनेक भागाला तडे गेले आहे. हवामान खात्याने विदर्भातील काही जिल्हयात विजेसह अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज वर्तविला होता. हवामान खात्याने लावलेला तो अंदाज पुसद तालुक्यात खरा ठरला. जिल्ह्यात दिवसभर उन्हाचे चटके लागत होते. मात्र रात्र होता होता थंडी पडण्यास सुरूवात झाली. त्यानंतर रात्री १ वाजताच्या दरम्यान पावसाला सुरूवात झाली. तर गहुली गावात रात्री पावसासह विजेचा कडकडाट ग्रामस्थांनी अनुभवला आहे.
गहुली येथील कै. वसंतराव नाईक व राजुसींग नाईक यांच्या समाधी स्थळावर विज कोसळल्याचे सकाळी नाईक यांच्या शेतात काम करणारे विनोद ढगे यांच्या निदर्शनास आले.