दारू विकणाऱ्या दुकानांची झडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 05:00 AM2020-04-19T05:00:00+5:302020-04-19T05:00:28+5:30

१८ मार्च रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्व दारू दुकानांची तपासणी करून तेथील स्टॉक किती याच्या नोंदी घेतल्या होत्या. दुकानांना सीलही लावले होते. मात्र बंदच्या काळात अधिकचा फायदा उचलण्यासाठी मागच्या दाराचा आधार घेऊन चोरट्या मार्गाने दारू विक्री सुरू आहे. कळंब येथील दारू दुकानाला पोलीस खात्यातूनच काहींचे अभय मिळाल्याने विक्री जोरात सुरू झाली.

Liquor Store | दारू विकणाऱ्या दुकानांची झडती

दारू विकणाऱ्या दुकानांची झडती

Next
ठळक मुद्देस्टॉकमध्ये तफावत । कळंब व छोटी गुजरीतील दुकानांना ‘खाकी’चे अभय

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लॉकडाऊन असल्याने सर्व दारू दुकाने बंद आहेत. या बंदच्या काळात जादा दराचा फायदा घेऊन दारू विक्री सुरू होती. कळंब येथील दारू दुकानाला थेट यवतमाळातून वर्दीचे अभय मिळत होते. या दुकानदाराने दोन पेट्या पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांना भेटही दिल्या. त्यामुळे त्याची हिंमत वाढली होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अचानक धाड टाकून तेथील स्टॉक तपासला. यात मोठी तफावत आढळून आली.
१८ मार्च रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्व दारू दुकानांची तपासणी करून तेथील स्टॉक किती याच्या नोंदी घेतल्या होत्या. दुकानांना सीलही लावले होते. मात्र बंदच्या काळात अधिकचा फायदा उचलण्यासाठी मागच्या दाराचा आधार घेऊन चोरट्या मार्गाने दारू विक्री सुरू आहे. कळंब येथील दारू दुकानाला पोलीस खात्यातूनच काहींचे अभय मिळाल्याने विक्री जोरात सुरू झाली. या मोबदल्यात संबंधित अधिकाऱ्यांना ब्रॅन्डेड पेट्या भेट देण्यात आल्या. यवतमाळ शहरात याचे काही लाभार्थी आहे. यामुळेच आपले काही बिघडणार नाही अशा अविर्भावात विक्री सुरू होती.
यवतमाळ शहरातील छोटी गुजरी येथील एका दारू दुकानातून मागच्या दाराने विक्री सुरू होती. राजरोसपणे हा प्रकार सुरू असल्याने अखेर राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने गुरुवारी धाड टाकली. तेथील स्टॉक तपासला असता. मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली. आता त्याचा अहवाल राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यावर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.
बंदच्या काळात दारु विक्री करणाऱ्या तीन बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. या दारू दुकान चालकांवरही कठोर कारवाई अपेक्षित आहे.

कळंबमधून दारू आणण्यासाठी चक्क ‘स्कॉटिंग’ !
कळंब येथील दारू दुकानातून ९ एप्रिलच्या रात्री २ वाजता थेट खात्याचे वाहन पोहोचले. दारूच्या वाहनाला स्कॉटिंग करीत यवतमाळ शहरात आणण्यात आले. येथे आल्यानंतर बक्षिसी म्हणून त्या अधिकाऱ्यांना त्यांच्या वाट्याच्या पेट्या पोहोचविण्यात आल्या. या कामात रजेवर असलेल्या अधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Liquor Store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.