घाटंजी तालुक्यात तीन शाळांना कुलूप ठोकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 10:30 PM2018-07-24T22:30:43+5:302018-07-24T22:31:09+5:30

तालुक्यातील सावरगाव, रामनगर, मंगी येथील जिल्हा परिषद शाळांना संतप्त पालकांनी कुलूप ठोकले. सावरगाव येथे सात वर्गांसाठी केवळ एकच शिक्षक असून विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने पालकांनी मंगळवारी हा पवित्रा घेतला.

Locked three schools in Ghatanji taluka | घाटंजी तालुक्यात तीन शाळांना कुलूप ठोकले

घाटंजी तालुक्यात तीन शाळांना कुलूप ठोकले

Next
ठळक मुद्देपालक आक्रमक : सावरगाव, मंगी, रामनगरात शिक्षकांसाठी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : तालुक्यातील सावरगाव, रामनगर, मंगी येथील जिल्हा परिषद शाळांना संतप्त पालकांनी कुलूप ठोकले. सावरगाव येथे सात वर्गांसाठी केवळ एकच शिक्षक असून विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने पालकांनी मंगळवारी हा पवित्रा घेतला.
सावरगाव येथील शाळेला पाच शिक्षक मंजूर आहे. मात्र चार पदे रिक्त आहे. चार शिक्षक मिळावे, या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून पालक प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे. यावर्षी शिक्षिकांच्या आॅनलाईन बदल्या झाल्यानंतर तालुक्यातील अनेक शाळा शिक्षकांविना आहे. अनेकांनी शाळा सोडून दाखले नेण्यास सुरुवात केली आहे.
पंचायत समिती सभापती, गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी चार दिवसात शिक्षक देतो, असे आश्वासन दिले होते. मात्र १५ दिवस लोटूनही शिक्षक मिळाले नाही.
तालुक्यातील रामनगर आणि मंगी येथील पालकांनीही शिक्षकांच्या मागणीसाठी शाळेला कुलूप ठोकले. रामनगर येथे शुक्रवारपासून शाळा बंद आहे. मंगी येथे मंगळवारी कुलूप ठोकण्यात आले. पुढील काही दिवसांत सगदा, सावंगी शाळेलाही कुलूप लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सावरगाव केंद्रातील १० पैकी सात शाळांना आत्तापर्यंत कुलूप ठोकण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा
शिक्षणाचा बालहक्क अधिनियमांतर्गत मुलांना शिक्षण देणे बंधनकारक आहे. मात्र प्रशासन या अधिनियमाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाºयांविरूद्ध गुन्हे दाखल करावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. सावरगावसह तालुक्यातील ठाणेगाव, मंगी, धामनधारी, रामनगर, भीमकुंड आदी सहा गावांतील शाळेवर एकही शिक्षक नाही. त्यामुळे पालक व शाळा व्यवस्थापन समितींनी शाळेला कुलूप लावण्याचा इशारा दिला आहे.

Web Title: Locked three schools in Ghatanji taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.