Lok Sabha Election 2019; यवतमाळ-वाशिमसाठी ६२ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 10:18 PM2019-04-11T22:18:04+5:302019-04-11T22:20:06+5:30

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले. यवतमाळ जिल्ह्यातील चार आणि वाशीममधील दोन अशा सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये एकंदर २२०६ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. सायंकाळी ५ पर्यंत ५$४.७१ टक्के मतदान नोंदविण्यात आले.

Lok Sabha Election 2019; 62 percent voting for Yavatmal and Washim | Lok Sabha Election 2019; यवतमाळ-वाशिमसाठी ६२ टक्के मतदान

Lok Sabha Election 2019; यवतमाळ-वाशिमसाठी ६२ टक्के मतदान

Next
ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : ४२.०५ अंशाच्या उन्हातही मतदानाला गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले. यवतमाळ जिल्ह्यातील चार आणि वाशीममधील दोन अशा सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये एकंदर २२०६ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. सायंकाळी ५ पर्यंत ५$४.७१ टक्के मतदान नोंदविण्यात आले. तर यात आणखी ९-१० टक्क्यांची भर पडून दिवसभराच्या मतदानाची सरासरी ६२ टक्क्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली. जिल्ह्यात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्तामुळे मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
गुरुवारी सकाळी ७ वाजतापासूनच मतदान केंद्रांकडे नागरिकांनी धाव घेतली होती. सकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी कमी असली तरी दुपारनंतर ती चांगलीच वाढली. भर उन्हातही बहुतांश केंद्रांवर मतदारांची गर्दी होती. प्रमुख चौकात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पेंडॉल टाकून मतदारांना चिठ्ठ्या देणे सुरू केले. परंतु, यंदा मतदारयादीतील नावे शोधण्यासाठी निवडणूक विभागाने मोबाईल अ‍ॅप विकसित केल्यामुळे मतदारांचे बरेचसे काम सोपे झाले होते. प्रत्येक मतदानकेंद्रावर सहकुटुंब आलेल्या मतदारांमुळे चहलपहल जाणवली. पती-पत्नी जोडीने येऊन मतदान करणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. त्यातच आई-बाबांसोबत आलेल्या चिमुकल्यांनीही मतदानकेंद्रात ‘जिवंतपणा’ आणला. काही चिमुकले तर चक्क आईसोबत बॅलेट युनिटपर्यंत जाऊन आले. दिव्यांग मतदारांसाठी ठेवलेल्या व्हीलचेअर यावेळच्या मतदान प्रक्रियेचे वेगळे वैशिष्ट्य ठरले. अनेक दिव्यांगांसह वयोवृद्धांना त्यामुळे मतदान करणे सोईस्कर झाले. मात्र एकीकडे मतदारांचा उत्साह ओसंडून वाहत असताना अनेक मतदान केंद्रांवरच्या अवव्यस्थेने कळस गाठला.
यवतमाळ शहरातील महात्मा फुले शाळेतील केंद्रावर ईव्हीएम मशीन उशिरा सुरू झाली. या गोंधळात सकाळी आलेले ३० मतदार मतदान न करताच परत गेले. अखेर सकाळी साडेसात वाजता येथील मशीन सुरू झाल्यावर मतदानाची प्रक्रिया पुढे जाऊ शकली. त्याचवेळी गर्व्हमेंट हायस्कूलच्या मतदान केंद्रावरील ईव्हीएमही सुरू होत नव्हती. अखेर तज्ज्ञांना पाचारण करावे लागले. या ठिकाणी ‘सेव्हन डिजिट’ची अडचण उद्भवली होती. दाते कॉलेज केंद्रावर पाऊण तास विलंबाने मतदानाला सुरुवात झाली. कळंब तालुक्यातील कोठा येथील केंद्रावरही दोन तास ईव्हीएममधील बिघाड दुरुस्त होऊ शकला नव्हता.

तापमानावर स्वार मताधिकार, लोकसभ्यतेचा चमत्कार
गुरुवारी सूर्याचा पारा ४२ अंशाच्या पलीकडे पोहोचलेला होता. मात्र या तळपत्या उन्हातही लोकांनी लोकशाहीची सभ्यता पाळत मतदानासाठी मतदान केंद्रांवर धाव घेतली होती. सकाळी अत्यल्प प्रमाणात झालेले मतदान दुपारच्या सुमारासच खºया अर्थाने वाढल्याची बाब निदर्शनास आली. एकीकडे तापमानाचा चढता पारा आणि दुसरीकडे मतदानाची वाढती टक्केवारी अशी स्पर्धाच या निमित्ताने रंगली होती. या स्पर्धेत राष्ट्रीय कर्तव्य जिंकले

यांनी बजावला मतदानाचा हक्क
पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, माजी खासदार विजय दर्डा, खासदार भावना गवळी, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आमदार हरिभाऊ राठोड, आमदार मनोहरराव नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, आमदार राजू तोडसाम, आमदार ख्वाजा बेग, आमदार डॉ.अशोक उईके, आमदार नीलय नाईक आदींनी मतदान केले.

Web Title: Lok Sabha Election 2019; 62 percent voting for Yavatmal and Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.