Lok Sabha Election 2019; आधी राष्ट्रीय कर्तव्य, नंतर कौटुंबिक कर्तव्याचा श्रीगणेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 10:46 IST2019-04-11T10:46:00+5:302019-04-11T10:46:38+5:30
येथील राळेगाव तालुक्यात असलेल्या झाडगाव येथे जिल्हा पं. केंद्राच्या शाळेतील बुथ क्र. २३७ वर आज मतदारांच्या रांगेत चक्क मुंडावळ््या बांधलेला एक तरुण उभा झाला.

Lok Sabha Election 2019; आधी राष्ट्रीय कर्तव्य, नंतर कौटुंबिक कर्तव्याचा श्रीगणेशा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: येथील राळेगाव तालुक्यात असलेल्या झाडगाव येथे जिल्हा पं. केंद्राच्या शाळेतील बुथ क्र. २३७ वर आज मतदारांच्या रांगेत चक्क मुंडावळ््या बांधलेला एक तरुण उभा झाला. भूषण अरुणराव केवटे असे या तरुणाचे नाव. आज सकाळी त्याच्या लग्नाचा मुहूर्त निश्चित झाला होता. मात्र त्याच दिवशी निवडणूक आल्याने त्याने लग्नासाठी सर्व तयारी तर केली पण आधी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले व मगच आपल्या कौटुंबिक कर्तव्याचा श्रीगणेशा केला.