Lok Sabha Election 2019; एमआयडीसी आहे, पण उद्योगांचा पत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 09:25 PM2019-04-02T21:25:09+5:302019-04-02T21:26:28+5:30

स्थानिक पातळीवर पाण्याची समस्या भीषण असून दिग्रसमध्ये दहा दिवसाआड नळ येतात. कचरा आणि नाल्यांची समस्या कायमच आहे, अशी व्यथा दिग्रस येथील पूजा टोकसिया यांनी बस प्रवासादरम्यान व्यक्त केली. त्याचवेळी पुसद तालुक्यातील वरूड येथील दीपक इनामे म्हणाले, आमच्या गावात खासदार निधी पोहोचलाच नाही.

Lok Sabha Election 2019; MIDC, but it does not know the industry | Lok Sabha Election 2019; एमआयडीसी आहे, पण उद्योगांचा पत्ता नाही

Lok Sabha Election 2019; एमआयडीसी आहे, पण उद्योगांचा पत्ता नाही

Next
ठळक मुद्दे३ विधानसभा मार्ग । १०७ कि.मी. प्रवास । एसटीच्या डब्यात बसून ‘लोकमत’ प्रतिनिधीने जाणून घेतले जनतेचे ‘मत’

रस्ते, पाण्याची समस्या दुर्लक्षित
प्रकाश लामणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : स्थानिक पातळीवर पाण्याची समस्या भीषण असून दिग्रसमध्ये दहा दिवसाआड नळ येतात. कचरा आणि नाल्यांची समस्या कायमच आहे, अशी व्यथा दिग्रस येथील पूजा टोकसिया यांनी बस प्रवासादरम्यान व्यक्त केली. त्याचवेळी पुसद तालुक्यातील वरूड येथील दीपक इनामे म्हणाले, आमच्या गावात खासदार निधी पोहोचलाच नाही. मानोरा येथील भुवनेश्वरी मेहरे आणि दिलीप मेहरे यांनीही रस्ते आणि पाण्याची समस्या मांडली. सरकारने खताचे भाव वाढविले. मात्र कापसाला भाव दिला नाही. एमआयडीसी बंद असल्याने बेरोजगारी वाढल्याचे मोहा (ता.पुसद) येथील जयसिंग राठोड म्हणाले.

विकासकामांवर भर आवश्यक
मंगरुळपीर ते वाशिम
39 कि.मी.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : लोकसभा निवडणुकीचा ज्वर दिवसेंदिवस वाढतच असून, ठिकठिकाणी मतदारांत विविध चर्चा झडत आहेत. अगदी रोजच्या प्रवासाची लालपरीही यातून सुटलेली नाही. मंगरुळपीर ते वाशिम या ४० किलोमीटर अंतराच्या प्रवासादरम्यान मतदार असलेल्या प्रवाशांत निवडणुकीची चर्चा चांगलीच रंगली. विकासकामांवर अधिकाधिक भर देऊन ती वेगाने पूर्ण करावी, असे मत प्रवासी मतदारांनी व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीच्या चर्चा ठिकठिकाणी झडत आहेत. भावी उमेदवार कसा असावा, कोणी काय केले, कोणाची प्रतिमा कशी, कोण्या उमेदवाराचे पारडे जड, राजकीय पक्षांच्या खेळी आदि विषय ठिकठिकाणी चर्चिले जात असतानाच मतदारांच्या समस्याही चर्चिल्या जात आहेत. अगदी बसप्रवासातही निवडणुकीवर चर्चा झडत असल्याने वाशिम-मंगरुळपीर या ४० किलोमीटर अंतराच्या प्रवासात मतदारांच्या चर्चेचा कानोसा घेतला असता सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत अनेकांनी विविध मते उपस्थित केली.

नैसर्गिक आपत्तींचा विचार महत्त्वाचा !
कारंजा ते मानोरा
38 कि.मी.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कारंजा-मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसह सामान्य जनताही गेल्या चार ते पाच वर्षांपासून विविध नैसर्गिक आपत्तींचा सामना करीत असून, शासन धोरणात नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासह त्यातून सावरण्यासाठी आवश्यक उपाय योजनांचा विचार महत्त्वाचा असल्याचे मत कारंजा-मानोरा या ३८ किलोमीटर अंतराच्या प्रवासादरम्यान मतदारांतून प्रकट झाल्याचे दिसले.निवडणुकीच्या पृष्ठभुमीवर मतदारांच्या ठिकठिकाणी होत असलेल्या चर्चांचा कल आणि भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यात कारंजा-मानोरा या मार्गावरील बसप्रवासात नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान यावर अनेकांनी मत व्यक्त केले.

Web Title: Lok Sabha Election 2019; MIDC, but it does not know the industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.