Lok Sabha Election 2019; महिलांनीच चालविले मतदान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 10:23 PM2019-04-11T22:23:56+5:302019-04-11T22:24:59+5:30

निवडणूक प्रक्रिया पुरूष मंडळीच पार पाडू शकते, हा गैरसमज महिलांनी गुरूवारी मोडीत काढला. महिलांनीच मतदान केंद्रावरील कामकाज चालविले. विशेष म्हणजे या ठिकाणची सुरक्षा व्यवस्थाही महिलांनीच सांभाळली.

Lok Sabha Election 2019; Polling booths run by women | Lok Sabha Election 2019; महिलांनीच चालविले मतदान केंद्र

Lok Sabha Election 2019; महिलांनीच चालविले मतदान केंद्र

Next
ठळक मुद्देसुरक्षारक्षकही महिलाच : निवडणूक आयोगाचा अनोखा प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : निवडणूक प्रक्रिया पुरूष मंडळीच पार पाडू शकते, हा गैरसमज महिलांनी गुरूवारी मोडीत काढला. महिलांनीच मतदान केंद्रावरील कामकाज चालविले. विशेष म्हणजे या ठिकाणची सुरक्षा व्यवस्थाही महिलांनीच सांभाळली.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी जिल्ह्यातील ८ मतदान केंद्रावर महिलांनीच संपूर्ण जबाबदारी पार पाडली. त्याकरिता निवडणूक विभागाने ३२ महिला क र्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. मतदान अधिकारी, सहाय्यक मतदान अधिकारी आणि सुरक्षा अधिकारी म्हणून महिलांनीच जबाबदारी सांभाळली.
विशेष म्हणजे, ज्या मतदान केंद्रावर पुरूषापेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे, अशा ठिकाणी महिला मतदान केंद्र उभारण्यात आले. यवतमाळातील मांडळे हायस्कूलमध्ये अशा स्वरूपाचे मतदान केंद्र पहायला मिळाले. या ठिकाणी महिलांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. श्रद्धा क्षीरसागर यांच्या नेतृत्वात या चमूने मतदान केंद्राचे कामकाज हाताळले. अर्चना डहाके, सीमा राऊत, संगीता नरवाडे, अर्चना शिरभाते या महिला कर्मचाऱ्यांच चमूमध्ये समावेश होता. या केंद्रावरील शांततेत मतदान पार पाडले.
यावेळी निवडणूक यंत्रणेने महिलांमधील कार्यक्षमतेला विशेष वाव मिळवून देण्यासाठी सखी मतदान केंद्र ही संकल्पना राबविली. त्यासाठी प्रत्येक विधानसभा निहाय ठराविक मतदान केंद्रे सांभाळण्याची जबाबदारी संपूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली. महिलांनीही ती जबाबदारी लिलया पार पाडली.
विशेष म्हणजे शिस्तबद्ध कारभार या केंद्रांवर पहायला मिळाला. शिस्तीसोबतच मतदान केंद्रांची सजावट महिला कर्मचाऱ्यांनी केली होती.
शिवाय केंद्रावर येणाºया प्रत्येक मतदाराला पुष्प भेट देऊन त्याचे स्वागतही करण्यात आले. या प्रकारामुळे मतदान प्रक्रियेतील महिला कर्मचाऱ्यांची सक्षमता सिद्ध झाली. तर दुसरीकडे सर्व सामान्य मतदारांनाही लोकशाही प्रक्रियेतील सुखद अनुभव घेता आला.
सखी मतदान केंद्रांची सजावट
अशा प्रकारच्या मतदान केंद्रांना ‘सखी मतदान केंद्र’ असे नाव देण्यात आले होते. विशेष म्हणजे या मतदान केंद्रांची रंगीबिरंगी फुगे लावून सजावटही करण्यात आली होती. यानिमित्ताने महिलांनी मतदान प्रक्रियेतील आपली कामगिरी सिद्ध केली आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019; Polling booths run by women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.