Lok Sabha Election 2019; मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज, कर्मचारी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 09:22 PM2019-04-10T21:22:15+5:302019-04-10T21:24:33+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी वणी येथील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. वणी विधानसभा मतदार संघात एकूण दोन लाख ८२ हजार ५४२ मतदार असून गुरूवारी लोकसभा निवडणुकीसाठी ते आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्ट्राँग रूम तयार करण्यात आले असून तेथूनच निवडणूक प्रक्रीयेच्या हालचाली होत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : लोकसभा निवडणुकीसाठी वणी येथील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. वणी विधानसभा मतदार संघात एकूण दोन लाख ८२ हजार ५४२ मतदार असून गुरूवारी लोकसभा निवडणुकीसाठी ते आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्ट्राँग रूम तयार करण्यात आले असून तेथूनच निवडणूक प्रक्रीयेच्या हालचाली होत आहेत.
लोकसभा निवडणुकीकरिता चंद्रपूर मतदार संघात चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, बल्लारपूर, राजूरा, कोरपना, केळापूर, आर्णी, वणी, झरी, मारेगाव या तालुक्यांचा समावेश आहे. वणी विधानसभेमध्ये एकूण दोन लाख ८२ हजार ५४२ मतदार असून यात एक लाख ३५ हजार ५३६ महिला व एक लाख ४६ हजार ७१३ पुरूष मतदार आहेत. हे सर्व मतदार १३ उमेदवारांचे भाग्य ठरविणार आहेत. वणी विधानसभा क्षेत्रामध्ये एकुण ३२५ मतदान केंद्र असून यातील सात केंद्र हे अतिसंवेदनशील आहे. मंगळवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावली. निवडणूक विभागातर्फे एक हजार ५२४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात जिल्हा परिषद शिक्षक, प्राध्यापक व अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
या सर्व मतदान केंद्रांवर बुधवारीच इव्हीएम मशिन व व्हीव्हीपॅट मशिन पाठविण्यात आल्या. आहे. सकाळी ११ वाजतापासूनच ही प्रक्रिया सुरू झाली होती. यासाठी महामंडळाच्या ३२ बसेस, नऊ स्कूल बस व १६ जीपद्वारे मतदान साहित्य केंद्रापर्यंत पोहोचविण्यात आले. निडणूक ओळखपत्राबरोबर इतर ११ प्रकारचे ओळखपत्र मतदानासाठी वापरता येणार आहे. यापैकी कोणतेही एक ओळखपत्र मतदारांना सोबत आणावयाचे आहे. ओळखपत्रावर स्पष्ट छायाचित्र नसल्यास कोणतेही ओळखपत्र मतदान अधिकाºयाला दाखवून मतदान करता येणार आहे.
लोकसभा निवडणूक प्रक्रियेसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या पटांगणात तयारी करण्यात आली आहे. येथील स्ट्राँग रूममध्येच इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन ठेवण्यात आल्या आहेत. मतदानानंतर संपूर्ण व्हीव्हीपॅट एकत्र करून त्या चंद्रपूरला पाठविण्यात येणार आहे.
येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. एका मशिनवर १३ उमेदवारांची नावे आणि एक बटण नोटासाठी असणार आहे. तर इव्हीएमवर उमेदवारांचे फोटोसुद्धा लावण्यात येणार आहे. इव्हीएम मशिनमध्ये बिघाड आल्यास अतिरीक्त व्यवस्था करण्यात आली आहे. बिघाडासंबंधी सूचना मिळताच दुसरी मशिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
वेकोलि कर्मचाऱ्यांना सुटी नाकारली
लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करता यावे यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालय, सार्वजनिक उपक्रम, केंद्र व राज्य शासनाचे कार्यालय व इतर प्रतिष्ठांनाना सुटी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु वेकोलिने या आदेशाला हरताळ फासला आहे. वेकोलित कार्यरत कर्मचाºयांना मतदानासाठी केवळ दोन तासांची सुटी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे अनेक कर्मचारी मतदान करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.