Lok Sabha Election 2019; भावना गवळी म्हणतात, रडण्यापेक्षा लढण्यावर विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 10:16 PM2019-04-07T22:16:53+5:302019-04-07T22:17:29+5:30

राजकारणात पावलागणिक आव्हानं असतात. महिला म्हणून तुम्हाला कोणी सहानुभूती दाखवत नसते. इथे स्वत:च स्वत:ला सिद्ध करावे लागते. रडण्यापेक्षा लढण्यावर मी विश्वास ठेवते, त्यामुळेच विजयाबाबत कॉन्फिडंट आहे.

Lok Sabha Election 2019; The spirit is called Gavali, trusting the fight rather than crying | Lok Sabha Election 2019; भावना गवळी म्हणतात, रडण्यापेक्षा लढण्यावर विश्वास

Lok Sabha Election 2019; भावना गवळी म्हणतात, रडण्यापेक्षा लढण्यावर विश्वास

Next
ठळक मुद्देविजय माझाच : काँग्रेसने कामच केले नाही, तर आव्हान कसले?

यवतमाळ : राजकारणात पावलागणिक आव्हानं असतात. महिला म्हणून तुम्हाला कोणी सहानुभूती दाखवत नसते. इथे स्वत:च स्वत:ला सिद्ध करावे लागते. रडण्यापेक्षा लढण्यावर मी विश्वास ठेवते, त्यामुळेच विजयाबाबत कॉन्फिडंट आहे. यावेळीही शंभर टक्के माझेच चॅन्सेस आहेत, असा विश्वास शिवसेना-भाजप युतीच्या लोकसभेच्या उमेदवार भावना गवळी यांनी व्यक्त केला.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून पाचव्यांदा निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या भावना गवळी सध्या प्रचारासाठी गावोगावी फिरत आहेत. याच धावपळीत त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
त्या म्हणाल्या, माझी फाईट वंचित बहुजन आघाडीशी असेल. कारण दलित, मुस्लीम मते असा हिशेब करून ते प्रयत्न करीत आहेत. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांचे मला आव्हान वाटत नाही. कारण त्यांनी मंत्री, उपसभापतीपद, प्रदेश अध्यक्षपद सांभाळले मात्र ते स्वत:च्या मुलालाही निवडून आणू शकले नाही. राहुल ठाकरेंना दुसऱ्या क्रमांकाचीही मते मिळू शकली नव्हती. त्यांनी या भागासाठी कोणते काम केले? स्वत:ची गिरणीही सांभाळू शकले नाही. ही काही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही. लोकसभेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरच होत असते.
पण तुम्हाला पक्षांतर्गत विरोध होतोय, त्याचे काय? या प्रश्नावर गवळी म्हणाल्या, मला कुणाचाच विरोध नाही. विरोधक मुद्दाम अशा शंका पसरविण्याचे काम करीत आहे. भाजप आणि शिवसेनेचे सर्व नेते माझ्या प्रचारासाठी काम करीत आहेत. परंतु, आडे आणि वंचित आघाडीचे पवार या उमेदवारांमुळे बंजारा मते तुमच्यापासून दूर जाणार नाही का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, निलय नाईक, संजय राठोड हे आमच्या सोबत आहेत. शिवाय, वर्धा-यवतमाळ-नांदेड हा रेल्वेमार्ग आम्ही दिग्रसपासून थेट पोहरादेवीपर्यंत नेला आहे. या मुद्द्यावर बंजारा मते आमच्यापासून फुटणार नाहीत.
तुम्हाला यावेळी अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसेल असे दिसते, या मुद्द्यावर भावना गवळी म्हणाल्या, अँटी इन्कम्बन्सी तिसऱ्या वेळी असते. मी आता पाचव्यांदा निवडणुकीला सामोरी जात आहे. मला लोकांनी पूर्णपणे स्वीकारले आहे. निवडून आल्यानंतर तुम्ही लोकांना भेटत नाही, अशी अनेकांची तक्रार आहे, या मुद्द्यावर भावना गवळी म्हणाल्या, बघा हा मतदारसंघ खूप मोठा आहे. प्रत्येक गावात भेट द्यायची म्हटले तर पाच वर्षही पुरणार नाही. आणि दुसरे म्हणजे, पार्लमेंट कधी अटेंड करायची मग? नंतर तुम्हीच म्हणता ना भावनातार्इंची संसदेत केवळ ७४ टक्के उपस्थिती. तरीही मतदारसंघात मी प्रत्येक कार्यक्रम अटेंड करते, वेळोवेळी मेळावे घेत असते. मी खासदार असूनही आमदारासारखी, सामान्य शिवसैनिकासारखी काम करते.
आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात जिल्ह्यात कोणती कामे झाली, याबाबत गवळींनी सांगितले की, वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाच्या कामाला आम्ही गती दिली. यात भूमिअधिग्रहणासाठी सर्वांचे सहकार्य मिळाले. यापूर्वी राज्यात आमची सत्ता नव्हती. अन्यथा हे काम आधीच पूर्ण करू शकलो असतो. कृषीपंपाच्या जोडण्या दिल्या. भारनियमन कमी झाले. शकुंतला रेल्वेमार्गही ब्रॉडगेज करण्याचा १९०० कोटींचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव सध्या वित्त विभागाकडे आहे.

जिल्ह्यात ‘काँग्रेस माणिकरावमुक्त’ करा
भावना गवळी म्हणाल्या, गेल्यावेळी लोकसभेत काँग्रेसमुक्त भारत हा नारा होता. मात्र यंदा आपल्या जिल्ह्यापुरता तरी ‘माणिकराव मुक्त काँग्रेस करा’ असा सूर आहे. त्यांनी या जिल्ह्यासाठी काही केले नाही. मी प्लेन खासदार असूनही खर्डा प्रकल्पासाठी ९५ कोटी आणले. सुपरस्पेशालिटीसाठी १३० कोटी आणले. सेंट्रल स्कूलसाठी जागा दिली. हे काँग्रेसला का सूचले नाही? या मतदारसंघात जातीनुसार मतविभाजन होईल का हा फॅक्टरच नाही. कोण काम करतो, हेच मतदार बघत असतात.

आडे भाजपचे नाहीतच
भाजप बंडखोराबाबत गवळी म्हणाल्या, पी. बी. आडे हे भाजपचे नाहीतच. भाजपने त्यांना समर्थनही दिलेले नाही. जिल्हाध्यक्ष डांगे यांनी तर आडेंशी आमचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019; The spirit is called Gavali, trusting the fight rather than crying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.