Lok Sabha Election 2019; वणीत उमेदवारांचा बैठकीवर भर, प्रचारात अद्याप रंगत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 09:47 PM2019-03-30T21:47:28+5:302019-03-30T21:49:12+5:30

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उणेपुरे १२ दिवस उरले असताना वणी विधानसभा मतदार संघात अद्यापही जाहीर प्रचारात रंगत आली नाही. उमेदवार केवळ बैठकांवर भर देत आहेत. प्रचाराची हवी तशी सुरूवात न झाल्याने कार्यकर्त्यांतही निरुत्साहाचे वातावरण आहे.

Lok Sabha Election 2019; Vanity candidates do not stress in the meeting, yet in the campaign | Lok Sabha Election 2019; वणीत उमेदवारांचा बैठकीवर भर, प्रचारात अद्याप रंगत नाही

Lok Sabha Election 2019; वणीत उमेदवारांचा बैठकीवर भर, प्रचारात अद्याप रंगत नाही

Next
ठळक मुद्देकार्यकर्त्यांत निरूत्साह : मतदारांना मोठ्या सभांची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उणेपुरे १२ दिवस उरले असताना वणी विधानसभा मतदार संघात अद्यापही जाहीर प्रचारात रंगत आली नाही. उमेदवार केवळ बैठकांवर भर देत आहेत. प्रचाराची हवी तशी सुरूवात न झाल्याने कार्यकर्त्यांतही निरुत्साहाचे वातावरण आहे.
या परिसरात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असला तरी निवडणुकीचे वातावरण मात्र अद्यापही हवे तसे तापले नाही. कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारीचा गोंधळ अखेरपर्यंत सुरू राहिल्याने कार्यकर्ते संभ्रमात होते. अगदी शेवटच्या दिवशी उमेदवारीचा तिढा सुटला. आता कार्यकर्ते कामाला लागले असले तरी त्यांच्यात हवा तसा जोश अद्याप दिसत नाही. या भागात भाजपाचा ‘बेस’ तयार असला तरी प्रचार अद्याप बैठकांच्या पुढे सरकू शकलेला नाही.
केवळ १२ दिवसांत या उमेदवारांना संपूर्ण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. लोकसभा मतदार संघाचा विस्तार लक्षात घेता हे उमेदवार प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहचतील काय, आपले म्हणणे मतदारांपुढे मांडू शकतील काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मतदारांपर्यंत पोहचण्याचे एकमेव माध्यम हे जाहीर सभा आहे. परंतु या भागात आतापर्यंत अद्याप एकही जाहीर सभा झाली नाही. त्यामुळे निवडणुकीचा माहौल थंडा असल्याचे दिसून येत आहे.
सध्या जवळपास सर्वच उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या जुळवाजुळवीवर लक्ष केंद्रीत केले आहे. कार्यकर्ते, नेत्यांचे रुसवे, फुगवे दूर करण्यासाठी उमेदवारांकडून प्रयत्न केले जात आहेत. पाच वर्षांच्या काळात जाणते अजाणतेपणी काही नेते, कार्यकर्ते पक्षाच्या दूर गेले, त्यांचीही समजूत काढून पुन्हा त्यांना आपल्या छावणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मतदानाच्या दिवशी उमेदवारांची लागणार कसोटी
वणी परिसरात मोठ्या प्रमाणावर कोळशाच्या खाणी असल्याने या भागातील तापमान तुलनेत खूप अधिक असते. यावर्षी उन्हाचा पारा अधिक आहे. ११ तारखेपर्यंत तापमानाचा पारा आणखी वाढणार आहे. अशा परिस्थितीत मतदानासाठी मतदार घराबाहेर पडतील काय, हा प्रश्नदेखील उमेदवारांना अस्वस्थ करीत आहे. मतदानाच्या दिवशी उमेदवारांची कसोटी लागणार आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019; Vanity candidates do not stress in the meeting, yet in the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.