मातोश्री विद्यालयात लोकमत संस्कार मोतीचे बक्षीस वितरण
By admin | Published: January 7, 2016 03:04 AM2016-01-07T03:04:10+5:302016-01-07T03:04:10+5:30
लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकमत संस्काराचे मोती ‘जरा हटके’ स्पर्धेचे बक्षीस वितरण येथील मातोश्री विद्यालयात करण्यात आले.
महागाव : लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकमत संस्काराचे मोती ‘जरा हटके’ स्पर्धेचे बक्षीस वितरण येथील मातोश्री विद्यालयात करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून महागाव नगरपंचायतीचे उपाध्यक्ष उदय नरवाडे, ठाणेदार प्रकाश शेळके, बाळू कदम, अमोल शिंदे, रमेश देशमुख उपस्थित होते. यावेळी पाचव्या वर्गातील विद्यार्थी दर्शन आडे याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस हेलिकॉप्टर देण्यात आले, तर तिसऱ्या वर्गातील विद्यार्थिनी प्रियांशू अंधारे हिला वॉल कार आणि दुसरीची विद्यार्थिनी श्रावणी सावंत हिला तिसऱ्या क्रमांकाचे टिफिन बॉक्स पुरस्कार देण्यात आला. तसेच ओंकार नरवाडे, शिवाणी लोखंडे, रोहीत भिसे, भुवनेश भांगे, साक्षी पांडे, दिव्या कदम, श्रेया मोटरवार, ओमकार काळसरे, कृष्णा ठमके, देवदत्त फड यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.
यशस्वीतेसाठी शिक्षक व्ही.एम. दुधे, सी.ए. राऊत, आर.पी. भांगे, व्ही.पी. गायकवाड, व्ही.पी. वानखडे, ए.एस. खोसे, आर.एन. कांबळे, एन.पी. चव्हाण, जी.जे. मोहेकर, एस.डी. गोदरे, जी.बी. नरवाडे, पी.आर. मुधळ, एस. शिखरे यांच्यासह प्राचार्य अनूताई गावंडे आणि संस्थेचे संस्थापक दिगांबर जगताप यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)