आर्द्रतेच्या नावाखाली कापूस उत्पादकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:19 PM2017-10-18T23:19:52+5:302017-10-18T23:20:02+5:30

शेतकºयांना कापसात जादा आर्द्रता असल्याची बतावणी करून व्यापारी कमी दरात कापूस खरेदी करीत आहे. यात शेतकरी लूटले जात असून यंत्रणा मात्र सुस्तच आहे.

Loot of cotton growers in the name of humidity | आर्द्रतेच्या नावाखाली कापूस उत्पादकांची लूट

आर्द्रतेच्या नावाखाली कापूस उत्पादकांची लूट

Next
ठळक मुद्देकेवळ ३८०० रूपये दर : प्रशासनासह राजकीय नेत्यांचेही दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : शेतकºयांना कापसात जादा आर्द्रता असल्याची बतावणी करून व्यापारी कमी दरात कापूस खरेदी करीत आहे. यात शेतकरी लूटले जात असून यंत्रणा मात्र सुस्तच आहे.
तालुक््यात कापूस खरेदीची मोठी व्यापारपेठ म्हणून फुलसावंगी कडे बघितले जाते. काळी दौ., हिवरा, आणि गुंज येथील खासगी कापूस खरेदीला ११ आॅक्टोबरपासून सुरूवात झाली. या सर्व ठिकाणी व्यापाºयांनी शेतकºयांना लुटण्याचा बेत आखलेला दिसत आहे. गुंज येथे मुहूर्ताला ४१00 रूपयांचा दर देण्यात आला. मात्र जेमतेम पाच, दहा क्विंटलची खरेदी होताच व्यापाºयांनी दर पाडले.
सोमवारी तालुक्यात बहुतांश बाजारात कापसाच्या गाड्या उभ्या होत्या. गुंज येथे पुसद तालुक्यातील बोरी येथून आलेला शेतकरी कापूस विकताना अक्षरश: ढसाढसा रडला. कापसावर प्रचंड खर्च केला. परंतु भाव मात्र ३८०० रुपये मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच प्रति क्विंटल ११ किलोची ‘कट्टी’ घेतली जात असल्याचेही सांगितले. याशिवाय हमाली आणि तोलाईचा खर्चही शेतकºयाला करावा लागतो. हा खर्च शेतकºयांच्या चुकाºयातून परस्परच कापला जातो.
शेतकºयांना भाव ३८०० रूपये सांगितला जात असला, तरी सर्व कपात वगळून प्रत्यक्षात त्यांच्या हाती प्रती क्विंटल ३२०० रूपयेच पडतात. मात्र शेतकºयांची लूट सुरू असताना तालुक्यात शासकीय दराने कापूस खरेदी करण्याची मागणी कोणत्याही राजकीय नेत्यांनी केली नाही, हे विशेष.

फुलसावंगीचे कापूस मार्केट १०० कोटींचे
तालुक्यातील फुलसावंगी येथे दरवर्षी जवळपास १00 कोटींची कापूस खरेदी केली जाते. या खरेदीच्या तुलनेत कृषी उत्पन्न बाजार समितीला नाममात्र सेस भरला जातो. ही कोट्यवधींची उलाढाला कुणाच्याच लक्षात येत नाही. कापसाचा सेस म्हणून पावतीच फाडली जात नाही. अन्य पिकांची नोंद घेऊन सेसची पावती दिली जाते. या पहिल्या पायरीपासूनच शेतकºयांची लूट सुरू होते. यात संबंधित यंत्रणा आणि व्यापाºयांचे संगनमत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. तरीही कुणीच कारवाई करीत नसल्याने शेतकºयांची लूट सुरूच आहे.

Web Title: Loot of cotton growers in the name of humidity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.