तोतया पोलिसांनी पुसदच्या बँक कर्मचाऱ्याला एक लाखाने लुटले

By admin | Published: December 25, 2015 03:26 AM2015-12-25T03:26:59+5:302015-12-25T03:26:59+5:30

पोलीस असल्याची बतावणी करून बँक कर्मचाऱ्यास एक लाख रुपयाने लुटल्याची घटना बुधवारी दिवसाढवळ््या नगीना चौकात घडली.

Looted police looted one lakh rupees from the prostitutes bank employee | तोतया पोलिसांनी पुसदच्या बँक कर्मचाऱ्याला एक लाखाने लुटले

तोतया पोलिसांनी पुसदच्या बँक कर्मचाऱ्याला एक लाखाने लुटले

Next

भरदिवसाची घटना : चोरटे झाले सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
पुसद : पोलीस असल्याची बतावणी करून बँक कर्मचाऱ्यास एक लाख रुपयाने लुटल्याची घटना बुधवारी दिवसाढवळ््या नगीना चौकात घडली.
येथील राजराजेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी संदीप रामराव भवर हे यवतमाळ अर्बन बँकेतून तीन लाख रुपयांची रक्कम काढून पतसंस्थेकडे जात होते. यावेळी त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेल्या भामट्यांनी नगिना चौकात त्यांना रोखले. आम्ही पोलीस आहोत, अशी बतावणी करून तुझी बॅग पहायची आहे, असे म्हटले. यावेळी भवर यांचे काही एक ऐकुण न घेता त्यांच्या बॅगची झडती घेणे सुरू केले. एकाने संदीप भवर यांना बोलण्यात गुंतविले तर दुसऱ्याने चलाखीने पैसे उडविले. जेव्हा संदीप भवर पतसंस्थेत पोहोचले तेव्हा पैसे मोजले असता एक लाख रुपये कमी असल्याचे त्यांना लक्षात आले. त्यांनी त्वरित शाखा व्यवस्थापकांना ही माहिती दिली.
पोलिसातही तक्रार दिली.सीसीटीव्हीमध्ये भामट्यांचे चित्र कैद झाल्याने ते पकडले जाण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Looted police looted one lakh rupees from the prostitutes bank employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.