तुरीचा हमीदर घसरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
By admin | Published: February 2, 2017 12:20 AM2017-02-02T00:20:58+5:302017-02-02T00:20:58+5:30
गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात यावर्षी तुरीची दुप्पट लागवड झाली. तरी अतिपावसाने ुतुरीचे पीक हातून गेल्यामुळे उत्पादन निम्म्यावर आले.
यवतमाळ : गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात यावर्षी तुरीची दुप्पट लागवड झाली. तरी अतिपावसाने ुतुरीचे पीक हातून गेल्यामुळे उत्पादन निम्म्यावर आले. असे असतानाही खुल्या बाजारात तुरीचे दरही निम्यावर आले आहेत. हे दर
हमीदराच्याही खाली घसरले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना जबर
नुकसानीचा सामना करावा लागणार आहे.
गतवर्षी १० हजार रूपये क्विंटलपर्यंत वर चढलेली तूर घसरून पाच हजारापर्यंत खाली आली होती. या दरातही आणखी घसरण नोंदविण्यात आली आहे. हे दर ५२०० रूपयावरून ४४०० रूपयांपर्यंत खाली आले आहेत. यामध्ये ८०० रूपयांची घसरण झाली आहे.
केंद्र शासनाने तुरीला ५०५० रूपये क्विंटलचा हमीदर जाहीर केला आहे. तरी खुल्या बाजारात सहकाराच्या नियमाचे उल्लंघन झाले आहे. हमीदराच्या खाली तुरीची बोली लावली जात आहे. अडचणीतील शेतकऱ्यांचे यातून मोठे नुकसान झाले आहे.
खुल्या बाजारात दर घसरल्याने शेतकऱ्यांना नाफेडला तूर विकण्याखेरीज पर्याय राहीला नाही. यामुळे नाफेडच्या केंद्राकडे शेतकऱ्यांचा मोर्चा वळला आहे. सध्या नाफेडने ५०५० रूपये क्विंटल दराने खरेदी सुरू केली आहे.
यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहे. १२ टक्के ओलावा आणि चाळणी करून या तुरीची खरेदी केली जाणार आहे. (शहर वार्ताहर)