राष्टÑीय ऐक्यासाठी धावले नेते, अधिकारी, विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 09:57 PM2017-11-01T21:57:40+5:302017-11-01T21:57:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : देशात सर्वत्र बंधुभाव व राष्टÑीय एकात्मता वृद्धींगत व्हावी या उदात्त हेतूने सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि शिक्षक दिग्रस येथे धावले. निमित्त होते. सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा गांधी स्मृतीदिनाचे.
येथील तहसील कार्यालयापासून काढण्यात आलेल्या एकता दौडला तहसीलदार किशोर बागडे यांनी मंगळवारी सकाळी ८.३० वाजता झेंडी दाखविली. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन दरवर्षी ‘संकल्प दिवस’ तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृतीदिन शहीद दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्त दिग्रस शहरात एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नगरपरिषदेचे बांधकाम सभापती बाळू जाधव, पंचायत समिती सदस्य सुलोचना कांबळे, महादेव सुपारे, शिवसेना तालुका प्रमुख राजकुमार वानखडे, संजय कुकडी, अरविंद गादेवार, ताई लाखाडे, माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे, नगरसेवक केतन रत्नपारखी, प्रमोद बनगीनवार, मुरलीधर कांबळे, वीज वितरणचे अभियंता गणेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक रणजित सिरसाट, शिक्षण विस्तार अधिकारी विलास जाधव, मुख्याध्यापक हाजी एजाजोद्दीन, अरविंद मिश्रा, इरफान खान, तोमरेश ठाकरे, मजहर अहमद खान, नासीर औरंगाबादे उपस्थित होते. शहरातील प्रमुख मार्गावरून फेरी मारल्यानंतर एकता दौडचा समारोप तहसीलच्या आवारात करण्यात आला.
यावेळी मुख्याधिकारी शेषराव टाले यांनी सर्वांना शपथ दिली. नायब तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी आभार मानले. या दौडमध्ये शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते.