लोकसभा उमेदवारीसाठी भाजपात मदन येरावारांची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 10:07 PM2018-01-29T22:07:21+5:302018-01-29T22:07:47+5:30

शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करताच भाजपामध्ये संभाव्य उमेदवार कोण? या मुद्यावर चर्चा झळू लागल्या आहेत.

Madan Yerawar's talk of BJP in Lok Sabha election | लोकसभा उमेदवारीसाठी भाजपात मदन येरावारांची चर्चा

लोकसभा उमेदवारीसाठी भाजपात मदन येरावारांची चर्चा

Next
ठळक मुद्देयवतमाळ-वाशिम : सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात, सर्वेक्षणातही ‘ए प्लस’

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करताच भाजपामध्ये संभाव्य उमेदवार कोण? या मुद्यावर चर्चा झळू लागल्या आहेत. त्यातूनच यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी पक्ष स्तरावर जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असल्याची भाजपाच्या आतील गोटातील माहिती आहे.
२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. गेल्या वेळी लोकसभा निवडणुका भाजपा-सेनेने युतीमध्ये तर विधानसभा स्वतंत्र लढल्या होत्या. यावेळी दोनही निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा झाली. तसे झाल्यास कुणाचा फायदा, कुणाचा तोटा, कोण वाढणार, कोण कमी होणार, कुणाकडे सक्षम उमेदवार आहे, कुणाकडे नाही, कोण सक्षम उमेदवार ठरु शकतो यावर राजकीय झडत्या झडत आहेत. त्याचे लोण मुंबईपासून यवतमाळच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे.
स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा प्रमुख विषय हा यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ आहे. कारण गेल्या वेळी येथे भाजपा-सेना युतीच्या उमेदवार म्हणून भावनाताई गवळी चौथ्यांदा विजयी झाल्या होत्या. यावेळी मात्र युती नाही. भाजपा व शिवसेनेचे स्वतंत्र उमेदवार राहणार आहे. त्याचवेळी काँग्रेस व राष्टÑवादी आघाडीत निवडणुका लढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे भाजपा व शिवसेना यांच्यापुढे मतविभाजनाचा धोका अधिक आहे.
स्वबळावर लोकसभा निवडणूक झाल्यास यवतमाळ-वाशिमचा भाजपाचा उमेदवार कोण हा प्रमुख मुद्दा सध्या राजकीय गोटात चर्चिला जात आहे. त्यातही ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांच्या नावावर भाजपात सर्वाधिक चर्चा होताना दिसते. येरावार हेच भाजपाचे लोकसभेसाठी योग्य उमेदवार कसे हे पटवून देताना कार्यकर्ते त्यांच्या सक्षमतेचे विविध पैलूही सांगत आहे. आमदार म्हणून सर्वत्र परिचित असलेल्या मदन येरावार यांच्याकडे पक्ष कार्यकर्त्यांची प्रचंड आर्थिक सक्षम फौज आहे. पालकमंत्री म्हणून आता वणीपासून उमरखेडपर्यंत दांडगा जनसंपर्क निर्माण झाला आहे. राज्यमंत्री म्हणून त्यांनी विविध विकास कामेही केली आहेत. ना. येरावार हे नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील मानले जातात. राज्याचे अर्थमंत्री, मुख्यमंत्र्यांशी त्यांचा थेट संपर्क आहे. त्यामुळे त्यांच्या विकासात्मक व्हिजनच्या फाईलींना कुठेच अडसर निर्माण होत नाही.
सेनेला एकाकी पाडले
चाणाक्ष राजकारणी असलेल्या मदन येरावारांनी शिवसेनेला शह देण्याची एकही संधी सोडली नाही. सर्वाधिक जागा असूनही जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेला विरोधी बाकावर बसविले. त्यामुळे तेथे शिवसेना एकाकी पडली.

Web Title: Madan Yerawar's talk of BJP in Lok Sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.