महागावात ५५ हजारांच्या चलनी नोटांची झाली राख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 10:15 PM2019-01-01T22:15:51+5:302019-01-01T22:17:02+5:30
शॉर्टसर्किटने कापसाच्या गंजीला लागलेल्या आगीसोबतच ५५ हजार रुपयांच्या नोटा जळून खाक झाल्या. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास महागाव(कसबा) येथे घडली.
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव(कसबा) : शॉर्टसर्किटने कापसाच्या गंजीला लागलेल्या आगीसोबतच ५५ हजार रुपयांच्या नोटा जळून खाक झाल्या. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास महागाव(कसबा) येथे घडली.
भिकू नरसिंग राठोड यांच्या घरात ठेऊन असलेला तीन क्विंटल कापूस जळाला. कापसाच्या गंजीला लागूनच असलेल्या प्लास्टिकच्या पेटीत ५५ हजार रुपये ठेऊन होते. गंजीसोबतच ही पेटी पेटली. त्यात ५५ हजार रुपये खाक झाले.
कापूस आणि रोख मिळून या शेतकऱ्याचे ६६ हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेचा पंचनामा महसूल विभागाकडून करण्यात
आला.