महागांवची वात्सल्यसिंधू दायी छबूताई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 10:39 PM2018-05-08T22:39:00+5:302018-05-08T22:39:00+5:30
समाजात निरनिराळी माणसं बघायला मिळतात. त्यातील त्याग, समर्पण कराणाऱ्यांचे नाव आदराने घेतले जाते. येथील वात्सल्यसिंधू दायी छबूताई याच प्रकारात मोडतात.
दीपक वगारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
महागांव कसबा : समाजात निरनिराळी माणसं बघायला मिळतात. त्यातील त्याग, समर्पण कराणाऱ्यांचे नाव आदराने घेतले जाते. येथील वात्सल्यसिंधू दायी छबूताई याच प्रकारात मोडतात.
काही व्यक्ती अशा असतात, की समाज त्यांचे ऋण फेडूच शकत नाही. महागाव येथील छबूताई इंगोले त्यापैकीच एक. अत्यंत निस्वार्थ भावनेने त्या काम करतात. त्यामुळे त्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या आहे. गावात एखाद्या गर्भवतीचा पोटात कळ येताच तिच्या कुटुंबातील सर्वांना या माऊलीची आठवण येते. संपूर्ण परिसरात छबूताई परिचित आहे. सुखरुप बाळंतपण करून स्त्रियांची काळजी घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. आजवर त्यांनी शेकडो बाळंतपण सुखरूप पार पाडले. तब्बल ३० वषार्पांपासू त्या अविरत सेवा आहे.
बाळंतपण करताना त्यांना कशाचीही अपेक्षा नसते. त्यांनी हा वारसा आई शेवंताबाईकडून घेतला. एका बाळंतीणीला त्या सतत सात दिवस सेवा देतात. स्वत: चंद्रमौळी झोपडीत वास्तव्य करूनही त्या बाळंतपणाच्या मोबदल्यात मिळेल ते आनंदाने स्वीकारतात. आत्तापर्यंत त्यांना कुठल्याही शासकीय योजनेचादेखील लाभ मिळाला नाही. घरात अठरा विश्व दारिद्रय असल्याने छबूताई रोजमजुरी करून उदरनिर्वाह करतात.
त्यांच्या मायाळू स्पर्शाने मात्र अनेक महिलांना उब मिळते. प्रसूती वेदना कमी होतात. मात्र छबूतार्इंच्या आयुष्यातील वेदना कधी संपणार, हा प्रश्न कायम आहे.