Maharashtra Election 2019 ; १२७ उमेदवारांचे नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 06:00 AM2019-10-05T06:00:00+5:302019-10-05T06:00:07+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यात मोठी गर्दी पहायला मिळाली. सर्व प्रमुख उमेदवारांनी अखेरच्या दिवशीच नामांकन दाखल करण्यास पसंती दर्शविली. बहुतांश उमेदवारांनी वाजतगाजत मिरवणूक काढून शक्तीप्रदर्शन केले. वणी, उमरखेड, दिग्रस, यवतमाळ, आर्णी या विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना व भाजपमध्ये बंडखोरी पहायला मिळाली.

Maharashtra Election 2019 ; 127 Nomination of candidates | Maharashtra Election 2019 ; १२७ उमेदवारांचे नामांकन

Maharashtra Election 2019 ; १२७ उमेदवारांचे नामांकन

Next
ठळक मुद्देसात विधानसभा मतदारसंघ : भाजप, शिवसेनेत बंडखोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सात विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी अखेरच्या दिवशीपर्यंत एकूण १२७ उमेदवारांनी नामांकन दाखल केले. त्यात बंडखोर व अपक्षांची संख्या मोठी आहे. सर्वाधिक २३ उमेदवारांनी उमरखेड विधानसभा मतदारसंघात नामांकन अर्ज दाखल केले आहेत. आर्णीत भाजप आमदार राजू तोडसाम यांची बंडखोरी चर्चेचा विषय ठरली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यात मोठी गर्दी पहायला मिळाली. सर्व प्रमुख उमेदवारांनी अखेरच्या दिवशीच नामांकन दाखल करण्यास पसंती दर्शविली. बहुतांश उमेदवारांनी वाजतगाजत मिरवणूक काढून शक्तीप्रदर्शन केले. वणी, उमरखेड, दिग्रस, यवतमाळ, आर्णी या विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना व भाजपमध्ये बंडखोरी पहायला मिळाली. उमरखेडमध्ये मात्र भाजप आमदाराचे तिकीट कापल्याने बंडखोरी होईल हा अंदाज खोटा ठरला. शुक्रवारी अखेरच्या दिवशी नामांकन दाखल करणाऱ्यांमध्ये आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके, आमदार अ‍ॅड. नीलय नाईक, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा समावेश आहे. उमेदवारी दाखल करताना युती व आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते. काही ठिकाणी एबी फॉर्मचा घोळ झाला. यवतमाळ मतदारसंघासाठी एमआयएमकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवाराला औरंगाबादपर्यंत जाऊनही एबी फॉर्म मिळाला नाही. तर वणीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर डॉ. महेंद्र लोढा यांनी वंचित बहुजन आघाडीचा एबी फॉर्म जोडला. कालपर्यंत भाजपमध्ये असल्याचे सांगून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पाठिंब्याच्या बळावर अपक्ष रिंगणात उतरण्याचे नियोजन असलेल्या संजय देशमुख यांना तारिक लोखंडवाला यांच्या उमेदवारीने धक्का दिला गेला. आता देशमुख अपक्ष रिंगणात उतरले आहे. शिवसेनेत एकाच वेळी चार मतदारसंघात झालेली बंडखोरी पाहता हे इच्छुक जिल्ह्याच्या एकाच जागेवर समाधान मानणाºया शिवसेना नेतृत्वावर नाराज असल्याचे स्पष्ट होते.

विधानसभानिहाय संख्या व प्रमुख उमेदवार
यवतमाळ मतदारसंघ - एकूण १५ उमेदवार : मदन येरावार भाजप, बाळासाहेब मांगुळकर काँग्रेस, संतोष ढवळे शिवसेना बंडखोर, गजानन इंगोले शिवसेना बंडखोर, बिपीन चौधरी प्रहार, योगेश पारवेकर वंचित बहुजन आघाडी, अ‍ॅड. अमोल बोरखडे विदर्भ राज्य आघाडी आदी.
पुसद मतदारसंघ - एकूण १९ उमेदवार : अ‍ॅड. नीलय नाईक भाजप, इंद्रनील नाईक राष्टÑवादी काँग्रेस, अभय गडम मनसे, ज्ञानेश्वर बेले वंचित बहुजन आघाडी, सविता अधव बसपा आदी.
दिग्रस मतदारसंघ - एकूण १५ उमेदवार : संजय राठोड शिवसेना, मो. तारिक मो. समी राष्टÑवादी काँग्रेस, संजय देशमुख भाजप बंडखोर, अजय दुबे भाजप बंडखोर, शहेजाद समीउल्ला खा वंचित आघाडी, एजाज नवाज खॉ बसपा आदी.
राळेगाव मतदारसंघ - एकूण २० उमेदवार : प्राचार्य डॉ. अशोक उईके भाजप, प्रा. वसंत पुरके काँग्रेस, गुलाब पंधरे प्रहार, माधव कोहळे वंचित आघाडी आदी.
आर्णी मतदारसंघ - एकूण १५ उमेदवार : अ‍ॅड. शिवाजीराव मोघे काँग्रेस, डॉ. संदीप धुर्वे भाजप, प्रा. राजू तोडसाम भाजप बंडखोर, नयना ठाकूर शिवसेना बंडखोर, अ‍ॅड. अनिल किनाके बहुजन मुक्ती पार्टी, निरंजन मसराम वंचित आघाडी, मारोती आत्राम गोंडवाना गणतंत्र पार्टी, दत्तात्रय सिडाम, अमोल मंगाम शिवसेना बंडखोर, बळीराम नेवारे बसपा आदी.
वणी मतदारसंघ - एकूण २० उमेदवार : संजीवरेड्डी बोदकुरवार भाजप, वामनराव कासावार काँग्रेस, राजू उंबरकर मनसे, डॉ. महेंद्र लोढा वंचित आघाडी, संजय देरकर अपक्ष, विश्वास नांदेकर शिवसेना बंडखोर, सुनील कातकडे शिवसेना बंडखोर, अजय धोबे संभाजी ब्रिगेड, प्रवीण खानझोडे बसपा, अनिल घाटे भाकप, संतोष भादीकर बसपा आदी.
उमरखेड मतदारसंघ - एकूण २३ उमेदवार : विजय खडसे काँग्रेस, नामदेव ससाने भाजप, डॉ. विश्वनाथ विणकरे शिवसेना बंडखोर, प्रमोद दुथडे वंचित आघाडी, कैलास वानखडे मनसे.

५ ऑक्टोबर : नामांकन अर्ज छाननी.
७ ऑक्टोबर:अर्ज मागे घेण्याची मुदत.
२१ ऑक्टोबर : मतदान
२४ ऑक्टोबर : मतमोजणी

Web Title: Maharashtra Election 2019 ; 127 Nomination of candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.