Maharashtra Election 2019 ; भाजप, शिवसेनेच्या मंत्र्यांना बढतीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 06:00 AM2019-10-26T06:00:00+5:302019-10-26T06:00:10+5:30

२०१४ च्या अखेरीस झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात मदन येरावार यांना कॅबिनेटपदी बढती देण्याऐवजी नवा आदिवासी चेहरा म्हणून राळेगावचे आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडे सुमारे पाच हजार कोटींचे वार्षिक बजेट असलेल्या आदिवासी विकास खात्याची जबाबदारी दिली गेली.

Maharashtra Election 2019 ; BJP, Shiv Sena ministers to seek increasing attention | Maharashtra Election 2019 ; भाजप, शिवसेनेच्या मंत्र्यांना बढतीचे वेध

Maharashtra Election 2019 ; भाजप, शिवसेनेच्या मंत्र्यांना बढतीचे वेध

Next
ठळक मुद्देदोघांना हवे कॅबिनेट : महत्त्वाच्या खात्यांवर नजरा

राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विधानसभेची नवी टर्म जिंकल्याने जिल्ह्यातील भाजप, शिवसेनेच्या मंत्र्यांना आपल्या डोक्यावरील लालदिवा कायम ठेवण्याचे तसेच कॅबिनेट पदावर बढती मिळविण्याचे वेध लागले आहे.
जिल्ह्यातून सध्या भाजपचे आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे मंत्रीमंडळात आहेत. २०१९ ची निवडणूक या तिघांनीही जिंकली आहे. त्यामुळे हे तिघेही पुन्हा मंत्री बनण्याची चिन्हे आहेत. परंतु त्यांना आता बढती हवी आहे. २०१४ च्या अखेरीस झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारात मदन येरावार यांना कॅबिनेटपदी बढती देण्याऐवजी नवा आदिवासी चेहरा म्हणून राळेगावचे आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. एवढेच नव्हे तर त्यांच्याकडे सुमारे पाच हजार कोटींचे वार्षिक बजेट असलेल्या आदिवासी विकास खात्याची जबाबदारी दिली गेली. अगदी तशाच पद्धतीने २०१४ लाच आमदारकीची हॅट्रट्रिक साधलेल्या संजय राठोड यांना धक्का दिला गेला. ते कॅबिनेटच्या प्रतीक्षेत असताना हे पद उस्मानाबाद जिल्ह्यातील परंतु यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेचे सदस्य तानाजी सावंत यांना दिले गेले. त्यामुळे भाजप व सेनेच्या दोन्ही राज्यमंत्र्यांमध्ये अन्यायाची भावना पहायला मिळत होती.
२०१९ च्या निवडणुकीत मंत्रिपदावर असलेले उईके, राठोड, येरावार हे तीनही चेहरे पुन्हा निवडून आले. संजय राठोड यांची मतांची आघाडी पश्चिम विदर्भात सर्वाधिक (६३६०७) आहे. या तीनही चेहऱ्यांना आता पुन्हा मंत्रिपदाचे वेध लागले. राठोड, येरावार यांना कॅबिनेट हवे आहे. कॅबिनेट मिळाल्यास खाते कोणते? याचीही चिंता आहे. एकीकडे कॅबिनेट आणि दुसरीकडे दुर्लक्षित खाते असा प्रयोग होण्याचीही भीती आहे. अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकासचे मंत्रीपद कायम राहिल, डिमोशन होणार नाही असा अंदाज आहे. जिल्ह्यात तीन दावेदार असल्याने एखाद्याला डच्चु तर मिळणार नाही ना, याची हुरहुर आहेच. कुणाकुणाला कॅबिनेट देणार असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. शिवसेनेच्या तानाजींचा तूर्त यवतमाळशी संबंध संपल्याने संजय राठोड यांच्या बढतीतील अडसर दूर झाल्याचेही मानले जाते.

जिल्हा मुख्यालयी निसटता विजय
जिल्ह्यात विधानसभेच्या सात पैकी सहा जागा भाजपने लढविल्या. त्यापैकी भाजपची पुसदची जागा गेली असली तरी तेथील उमेदवार अ‍ॅड. नीलय नाईक यांनी राष्ट्रवादीला जबर टक्कर दिली. नीलय नाईक यांना तब्बल ७९४४२ मते मिळाली. भाजपच्या विजयी उमेदवारांमध्ये सर्वाधिक ३५ हजार ४९६ मतांची आघाडी वणीचे संजीवरेड्डी बोदकुरवार यांना आहे. त्या खालोखाल राळेगावचे प्राचार्य डॉ. अशोक उईके यांना ९८७५ तर आर्णीचे डॉ. संदीप धुर्वे यांना ३१५९ मतांची आघाडी मिळाली. सर्वात कमी २२५३ मतांची आघाडी ही जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या व पालकमंत्री म्हणून पक्षाचे नाक असलेल्या यवतमाळच्या मदन येरावार यांना मिळाली आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 ; BJP, Shiv Sena ministers to seek increasing attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.