Maharashtra Election 2019 ; चिल्लर मोजताना यंत्रणेची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 06:00 AM2019-10-05T06:00:00+5:302019-10-05T06:00:11+5:30
शिवसेना नगरसेवक गजानन इंगोले यांनी बंडखोरी करीत अपक्ष नामांकन दाखल केले. त्यांच्या समर्थनार्थ अनामत रक्कम वर्गणीद्वारे गोळा करण्यात आली. तीच थैली घेऊन इंगोले तहसील कार्यालयात पोहोचले. मात्र दहा हजारांची चिल्लर घेण्यास सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी नकार दिला. केवळ एक हजार रुपयांचे चिल्लर नाणे घेण्याचे मान्य केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटातील मनोरंजक प्रसंग शुक्रवारी यवतमाळ विधानसभा मतदारसंघात प्रत्यक्ष घडला. यवतमाळ नगरपरिषदेतील शिवसेनेचे नगरसेवक तथा बंडखोर उमेदवार गजानन इंगोले यांनी विधानसभेचे नामांकन दाखल करण्यासाठी वाजतगाजत रॅली काढली. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात पोहोचल्यावर अनामत रक्कम म्हणून दहा हजार रुपयांची नाणी सादर केली. चिल्लरच्या भल्या मोठ्या ढिगातून एक, दोन व पाचचे कलदार मोजताना कर्मचाऱ्यांची अक्षरश: दमछाक झाली.
शिवसेना नगरसेवक गजानन इंगोले यांनी बंडखोरी करीत अपक्ष नामांकन दाखल केले. त्यांच्या समर्थनार्थ अनामत रक्कम वर्गणीद्वारे गोळा करण्यात आली. तीच थैली घेऊन इंगोले तहसील कार्यालयात पोहोचले. मात्र दहा हजारांची चिल्लर घेण्यास सहायक निवडणूक अधिकाऱ्यांनी नकार दिला. केवळ एक हजार रुपयांचे चिल्लर नाणे घेण्याचे मान्य केले. कर्मचाºयांनी एक हजारांची चिल्लर मोजली. सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अनंत देऊळगावकर यांची चिडचिडही पाहायला मिळाली. मात्र गजानन इंगोले यांनी पैसा आहे, घ्यावाच लागेल, अशी आग्रही भूमिका घेतली. त्यांच्या या फंड्याची चर्चा रंगली.