Maharashtra Election 2019 ; स्वत:चे घर भरणाऱ्यांना दिवाळीपूर्वी साफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 06:00 AM2019-10-20T06:00:00+5:302019-10-20T06:00:09+5:30

स्मृती इराणी म्हणाल्या की, भाजपने जनतेच्या आशीर्वादाने सत्तेला सेवेचा मार्ग बनविला आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी युवा मोर्चात असताना आम्ही संघर्ष केला आता छत्रपती किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून २४ हजार कोटी शेतकऱ्यांना १८ हजार कोटींची कर्जमाफी मिळाली आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्पपूर्ण केला. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून दहा कोटी परिवारांना उपचार खर्च केला जात आहे.

Maharashtra Election 2019 ; Clean your homeowners before Diwali | Maharashtra Election 2019 ; स्वत:चे घर भरणाऱ्यांना दिवाळीपूर्वी साफ करा

Maharashtra Election 2019 ; स्वत:चे घर भरणाऱ्यांना दिवाळीपूर्वी साफ करा

Next
ठळक मुद्देस्मृती इराणी । भाजपची प्रचार सभा, विरोधकांचे नेतृत्वच दिशाहीन झाल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सत्तेचा उपयोग स्वत:चे घर भरण्यासाठी करणाºया राजकीय पक्षाचा व त्यांच्या विचाराचा सफाया करण्याची हीच वेळ आहे. दिवाळीपूर्वी महाराष्ट्राला मतदान करून राष्ट्राला विजयी करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी केले. त्या पोस्टल मैदानात शनिवारी आयोजित जाहीर सभेत बोलत होत्या.
स्मृती इराणी म्हणाल्या की, भाजपने जनतेच्या आशीर्वादाने सत्तेला सेवेचा मार्ग बनविला आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी युवा मोर्चात असताना आम्ही संघर्ष केला आता छत्रपती किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून २४ हजार कोटी शेतकऱ्यांना १८ हजार कोटींची कर्जमाफी मिळाली आहे. दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्पपूर्ण केला. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून दहा कोटी परिवारांना उपचार खर्च केला जात आहे. ६० लाख शौचालये तयार करून आया-बहिणींची होणारी कुचंबना थांबविली आहे असा दावा त्यांनी केला.
दोन लाख ५० हजार महिला बचत गट तयार करून त्यांना दोन लाख करोड रुपयाचे अर्थसहाय्य दिले आहे. या उलट विरोधकांचे नेतृत्वच दिशाहीन झाले असून ते देशाला काय दिशा देणार असा प्रश्न स्मृती इराणी यांनी उपस्थित केला. लक्ष्मीचे आगमन होण्यापूर्वी आपण साफसफाई करतो.तसेच स्वार्थी विचारांच्या पक्षांना साफ करा म्हणजे आपल्या भागात समृद्धी येईल खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करता येईल, असे आवाहन स्मृती इराणी यांनी केले. यवतमाळच्या विकासाची मोठी यादी येथील उमेदवार मदन येरावार यांनी आपल्या पुढे मांडली असल्याचेही सांगितले.
यावेळी किशोर तिवारी, मदन येरावार यांनी मनोगत व्यक्त केले. मंचावर भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, जिल्हा परिषद सदस्य रेणू शिंदे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, गजानन डोमाळे, किशोर इंगळे, पंचायत समिती सभापती गजानन पाटील, जिल्हा परिषद सदस्य विनोद खोडे, किशोर जोतवाणी, नगरसेवक संदीप तातेड, संजय रंगे, सुजित मुनगीनवार आदी उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Clean your homeowners before Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.