Maharashtra Election 2019 ; यवतमाळ विधानसभेत धोटेंचाच सलग विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 06:00 AM2019-10-16T06:00:00+5:302019-10-16T06:00:19+5:30

१९६२ ते २०१९ या ५७ वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात अनेक राजकीय समीकरणे तयार झाली व लोपपावली. आता या नव्या हायटेक प्रचार तंत्राच्या युगात निवडणूक लढण्याची संकल्पनाही बदलली आहे. त्यासोबतच विजयाचे समीकरणही बदलले आहे. यवतमाळकर मतदार सातत्यानेच जाती-पातीच्या पलिकडे जाऊन जनमताचा कौल देत आला आहे.

Maharashtra Election 2019 ; Dhotse's victory in Yawatmal assembly | Maharashtra Election 2019 ; यवतमाळ विधानसभेत धोटेंचाच सलग विजय

Maharashtra Election 2019 ; यवतमाळ विधानसभेत धोटेंचाच सलग विजय

Next
ठळक मुद्दे१४ निवडणुका : पाच वेळा काँग्रेसचे वर्चस्व, भाजप व अपक्षाला तीन वेळा संधी

सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विधानसभेत १९६२ पासून २०१४ पर्यंत दोन पोटनिवडणुकांसह १४ सार्वत्रिक निवडणुका झाल्या. यामध्ये केवळ जांबुवंतराव धोटे यांनाच सलग दोन वेळा मतदारांनी पसंती दर्शविली. या १४ निवडणुकांमध्ये पाच वेळा काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला असला तरी त्यामध्ये दोन पोटनिवडणुकांचा समावेश आहे. आता २०१९ च्या निवडणुकीत अपक्ष, भाजप, काँग्रेस अशी लढत दिसत आहे. यापैकी मतदार कोणाच्या बाजूला कौल देतो याची उत्सुकता आहे.
यवतमाळ विधानसभेत १९६२, १९६७ आणि १९७८ या निवडणुकांमध्ये जांबुवंतराव धोटे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून बाजी मारली. दरम्यान १९७२ मध्ये फॉरवर्ड ब्लॉकचे रामचंद्र (बाबासाहेब) घारफळकर विजयी झाले होते. त्यानंतर पुन्हा १९८० मध्ये काँग्रेसचे आबासाहेब पारवेकर विजयी झाले. पोटनिवडणुकीत १९८२ मध्ये विजयाताई धोटे यांनी बाजी मारली. १९८५ मध्ये काँग्रेसकडून सदाशिवराव ठाकरे विजयी झाले. यानंतर १९९० च्या निवडणुकीत यवतमाळकर जनतेने जनता दलाचे अण्णासाहेब पारवेकर यांना संधी दिली. पुढे १९९५ मध्ये भाजपला पहिल्यांदा राजाभाऊ ठाकरे यांच्या रुपाने संधी मिळाली. १९९९ मध्ये पुन्हा जनमताने काँग्रेसच्या कीर्ती गांधी यांच्या बाजूने कौल दिला. नंतर २००४ मध्ये भाजपचे मदन येरावार विजयी झाले. २००९ मध्ये काँग्रेसचे नीलेश पारवेकर व २०१३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत नंदिनी पारवेकर यांच्या बाजूने जनमत राहिले. २०१४ मध्ये मदन येरावार भाजपकडून विजयी झाले.
आता निवडणूक लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले असून काँग्रेस, भाजप व शिवसेना बंडखोर अशी लढत होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सातत्याने नव्या चेहऱ्याला संधी देणाºया यवतमाळकर जनतेचा कौल २०१९ च्या निवडणुकीत कोणाच्या बाजूने राहतो याचे आराखडे बांधले जात आहे.

जाती-पाती पलीकडे जाऊन जनमताचा कौल
१९६२ ते २०१९ या ५७ वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात अनेक राजकीय समीकरणे तयार झाली व लोपपावली. आता या नव्या हायटेक प्रचार तंत्राच्या युगात निवडणूक लढण्याची संकल्पनाही बदलली आहे. त्यासोबतच विजयाचे समीकरणही बदलले आहे. यवतमाळकर मतदार सातत्यानेच जाती-पातीच्या पलिकडे जाऊन जनमताचा कौल देत आला आहे. या सर्व बाबी लक्षात घेता यवतमाळची निवडणूक सध्या अतिशय चुरशीची झालेली आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Dhotse's victory in Yawatmal assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.