Maharashtra Election 2019 ; शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 06:00 AM2019-10-14T06:00:00+5:302019-10-14T06:00:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कर्जमुक्तीच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्याची फसवणूक केली. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जाऊन सांत्वन करण्यासही या सरकारमधील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कर्जमुक्तीच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्याची फसवणूक केली. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जाऊन सांत्वन करण्यासही या सरकारमधील मंत्र्यांकडे वेळ नाही. आपले प्रयत्न शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे राहील, असे काँग्रेसचे यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अनिल उर्फ बाळासाहेब मांगुळकर यांनी सांगितले.
तिवसा, जामवाडी, भोयर या ग्रामीण भागात त्यांनी रविवारी गृहभेटी दिल्या. यावेळी रवी चव्हाण, प्रतीक राठोड, सलीम शेख, देवराव चव्हाण, विनोद राठोड, सुधाकर जाधव, पंजाबराव चव्हाण, व्यंकटराव डोळे आदींची उपस्थिती होती.
दुपारनंतर बाळासाहेब मांगुळकर यांनी वैशालीनगर, देवीनगर लोहारा, समर्थवाडी, साई मंदिर, बाजोरियानगर परिसर, मनिहार सोसायटी, मोर भवन, उमरसरा, संताजी मंदिर परिसरातील नागरिकांच्या भेटी घेतल्या.
शहरी भागातील दौऱ्यात बाळासाहेब मांगुळकर यांच्यासोबत शीलाताई इंगोले, जितेंद्र ढाणके, प्रा. बबलू देशमुख, अतुल राजगुरे, ऋषभ गुल्हाने, विमल मैशेरी, राहुल वानखेडे, संतोष पारधी, उमेश इंगळे आदी होते. सोबतच अरूण राऊत, चंद्रशेखर चौधरी, मनिष पाटील, राहुल ठाकरे आदी उपस्थित होते.
या दौऱ्यात महिलांचाही मोठा सहभाग आहे. आयूषी देशमुख, अलकाताई राऊत, नीलिमा धवसे, कल्पना बिजवे, श्वेता दिवटे आणि कल्पनाताई मांगुळकर यांनी बोधड, पिंपळगाव, राणाप्रतापनगर, संताजी मंदिर, तलावफैल या भागात गृहभेटी घेतल्या.
एनएसयूआयच्यावतीने कौस्तुभ शिर्के, ध्वनिका मांगुळकर, लोकेश इंगोले, दर्शनाताई इंगोले, मयूर देसाई, ओम फुटाणे आदी कार्यकर्ते दौºयात सहभागी झाले आहेत.
मधुकर भावे मार्गदर्शन करणार
महाराष्ट्रातील ख्यातनाम पत्रकार मधुकर भावे हे १५ ऑक्टोबर रोजी यवतमाळ दौऱ्यावर येणार आहे. ते विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात मतदारांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते कीर्ती गांधी यांनी दिली.