Maharashtra Election 2019 ; यवतमाळ मतदारसंघात भाजपचे मदन येरावार २२५३ मतांनी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 06:00 AM2019-10-25T06:00:00+5:302019-10-25T06:00:26+5:30

सुरुवातीला काँग्रेसकडे लीड होता. नंतर हळूहळू भाजपाच्या बाजूने जनमताचा कौल जात असल्याचे मतमोजणीतून पुढे आले. पोस्टल मतदानापैकी ८७९ मते काँग्रेस उमेदवाराला मिळाली, तर ५०८ मते भाजपचे मदन येरावार यांना आहे. याशिवाय अपक्ष व शिवसेनेचे बंडखोर उमेदवार संतोष ढवळे यांनी ३८ हजार ३४५ मते घेतली. निवडणूक मतमोजणी दरम्यान पाच इव्हीएम मशीन बंद पडल्या होत्या.

Maharashtra Election 2019 ; Madan Yerawar of BJP won by 2253 votes in Yavatmal constituency | Maharashtra Election 2019 ; यवतमाळ मतदारसंघात भाजपचे मदन येरावार २२५३ मतांनी विजयी

Maharashtra Election 2019 ; यवतमाळ मतदारसंघात भाजपचे मदन येरावार २२५३ मतांनी विजयी

Next
ठळक मुद्देअधिकृत घोषणेची रात्री उशिरापर्यंत करावी लागली प्रतीक्षा : भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष, फेरमतमोजणीची मागणी

सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व भाजप उमेदवारात थेट लढत झाली. भाजपचे विद्यमान मंत्री मदन येरावार यांना काँग्रेस उमेदवार बाळासाहेब मांगुळकर यांनी जोरदार टक्कर दिली. मतमोजणीच्या २६ व्या फेरीपर्यंत मांगुळकर यांचे मताधिक्य कायम होते. मात्र नंतर मदन येरावार यांनी कमबॅक करत काँग्रेसचा लीड भरून काढत आघाडी घेतली. ३० फेऱ्या पूर्ण झाल्या तेव्हा येरावार यांच्याकडे दोन हजार २५३ मतांची आघाडी होती. निवडणूक निकालाबाबत अधिकृत घोषणा रात्री उशिरापर्यंत झाली नाही.
मतमोजणीच्या ३० फेऱ्या झाल्या. त्यामध्ये सुरुवातीला काँग्रेसकडे लीड होता. नंतर हळूहळू भाजपाच्या बाजूने जनमताचा कौल जात असल्याचे मतमोजणीतून पुढे आले. पोस्टल मतदानापैकी ८७९ मते काँग्रेस उमेदवाराला मिळाली, तर ५०८ मते भाजपचे मदन येरावार यांना आहे. याशिवाय अपक्ष व शिवसेनेचे बंडखोर उमेदवार संतोष ढवळे यांनी ३८ हजार ३४५ मते घेतली.
निवडणूक मतमोजणी दरम्यान पाच इव्हीएम मशीन बंद पडल्या होत्या. त्याची मतमोजणी स्वतंत्ररित्या घेण्यात आली. यामध्ये कोण्या उमेदवाराला किती मते मिळाली हे जाहीर करण्यात आले नाही. याउपरही भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरातील सर्वच प्रमुख चौकात आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला. काही ठिकाणी ढोलताशे वाजवून विजयाचा मनमुराद आनंद घेण्यात आला. निकालाबाबत अधिकृत घोषणा वृत्त लिहिपर्यंत झाली नव्हती.

विजयाची तीन कारणे...
1भाजपा उमेदवाराला ग्रामीण भागातून विशेष करून बोरीअरब, अकोलाबाजार या परिसरातून मोठ्या प्रमाणात साथ मिळाली. त्यामुळेच काँग्रेसचे मताधिक्य पुढे कमी झाले.
2मतदारसंघातील विकास कामांचा मुद्दा पुढे करून ती पूर्ण करण्यासाठी पुन्हा संधी द्या, असे भावनिक आवाहन भाजपने केले होते.
3काँग्रेसला पारंपरिक मते भाजपला जाण्यापासून रोखण्यात अपयश आले. त्यामुळे शहरातील बहुतांश मतदान केंद्रांवर भाजप उमेदवाराने मते घेतली.

विकासाकरिता सदैव तत्पर
यवतमाळकरांनी मला पुन्हा दिलेल्या संधीचा पुरेपूर वापर करत विकास कामे पूर्णत्वास नेण्यावर भर दिला जाईल. हा विजय जनसामान्यांसह कार्यकर्त्यांचा आणि पक्षातील ध्येय धोरणाचा आहे.
- मदन येरावार, भाजप

जनतेचा प्रचंड मतांचा आशीर्वाद
जनतेने एक लाख ३६ हजार मतांचा प्रचंड आशीर्वाद दिला आहे. चौथ्यांदा सेवक म्हणून माझी निवड केली आहे. समाजसेवेचं व्रत घेऊन वाटचाल करत आलो. मतदारसंघाच्या विकासासाठी आणखी जोमाने काम करणार.
- संजय राठोड, शिवसेना

सर्वसामान्य जनतेचा विजय
पाच वर्षात विकासाची अनेक कामे केलीत. सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले. सर्वांसोबत प्रेम आणि आपुलकीची वागणूक होती. मंत्री असलो तरी कधी मंत्रिपदाचा आव आणला नाही. त्यामुळे हा विजय जनतेचा आहे.
- डॉ.अशोक उईके, भाजप

पराभवाचे चिंतन करू
काँगे्रस कार्यकर्त्याने निवडणुकीत विजयासाठी खूप परिश्रम घेतले. पाच जागांपैकी काही जागा अतिशय कमी फरकाने गेल्या. विजयी उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. पराभवाच्या कारणांचे विवेचन करण्यात येईल.
- आमदार डॉ. वजाहत मिर्झा, काँग्रेस जिल्हाध्यक्ष

अगदी थोड्या फरकाने पराभव
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पुसदची जागा कायम राखली. मात्र यवतमाळ, आर्णी, उमरखेड, वणी येथे कमी मताने पराभव झाला. जनमताचा कौल सत्तेविरोधातच आहे. वेळेवरच्या समीकरणाने मतांचे विभाजन झाले.
- आमदार ख्वाजा बेग, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

जिल्ह्यातील शेतकरी भाजपसोबत
इतर जिल्ह्याप्रमाणे येथील शेतकऱ्यांनी रोष प्रगट केला नाही. ते भाजपसोबतच राहिले. आता त्यांना भाजपने न्याय द्यावा. पालकमंत्र्यांना चांगला निरोप मतदारांनी दिला आहे. स्वभाव बदलवून ते विनम्रता अंगिकारतील अशी अपेक्षा आहे.
- किशोर तिवारी, शेतकरी नेते

Web Title: Maharashtra Election 2019 ; Madan Yerawar of BJP won by 2253 votes in Yavatmal constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.