Maharashtra Election 2019 : राज्यात सक्षम विरोधी पक्षाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 05:00 AM2019-10-15T05:00:00+5:302019-10-15T05:00:27+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वणीतील शासकीय मैदानावर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी सभास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. पाच वर्षांपूर्वी सत्ताधाऱ्यांनी दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण केली नसल्याचे सांगून आपल्या जाहिरनाम्यात भाजप, शिवसेनेने कोणकोणती वचने दिली होती, त्याचा पाढाच राज ठाकरे यांनी वाचला.

Maharashtra Election 2019 :The need for a competent opposition in the state | Maharashtra Election 2019 : राज्यात सक्षम विरोधी पक्षाची गरज

Maharashtra Election 2019 : राज्यात सक्षम विरोधी पक्षाची गरज

Next
ठळक मुद्देराज ठाकरे : वणी येथे मनसे उमेदवारांसाठी पार पडली प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : देशात, राज्यात सत्ताधाऱ्यांची मनमानी सुरू असून ही मनमानी थांबविण्यासाठी राज्यात सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे. हा विरोधी पक्ष उभा करण्यासाठी मला साथ द्या, असे भावनिक आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी येथे केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वणीतील शासकीय मैदानावर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी सभास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. पाच वर्षांपूर्वी सत्ताधाऱ्यांनी दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण केली नसल्याचे सांगून आपल्या जाहिरनाम्यात भाजप, शिवसेनेने कोणकोणती वचने दिली होती, त्याचा पाढाच राज ठाकरे यांनी वाचला. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी आज संकटात आहे. यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. ही बाब अभिमानाची नसल्याचेही त्यांनी सांगितले. आजही शेतकरी आत्महत्येच्या घटना घडतच असल्याचे ते म्हणाले. एका ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी एका शेतकऱ्याने ‘हे माझं सरकार’ असा मजकूर लिहून असलेलं टी शर्ट घालून आत्महत्या केली. काय चाललयं या राज्यात? असा सवाल करीत निवडणुकांना तुम्ही गंमत समजत असाल तर तुमचा आवाज असाच दाबला जाईल. त्यामुळे आजच जागे व्हा, असे आवाहनही ठाकरे यांनी उपस्थिताना केले.
जोपर्यंत सक्षम विरोधी पक्ष तयार होणार नाही, तोपर्यंत सत्ताधाऱ्यांची मनमानी थांबणार नाही, असेही ते म्हणाले. त्यामुळेच मला एक सक्षम विरोधी पक्ष तयार करायचा आहे. त्यासाठी आता मला तुमची साथ हवी आहे. नोटबंदीमुळे देशात मंदी आली असून त्यामुळे विविध उद्योगातून कर्मचाºयांना काढून टाकले जात आहे. यापुढे ३० टक्के सरकारी कर्मचाऱ्यांनाही नोकरीवरून काढले जाणार आहे. त्यामुळे आजच सावध व्हा, असेही ठाकरे यांनी सांगितले. तत्पूर्वी मनसेच्या उमेदवारांचीही भाषणे झालीत. यावेळी व्यासपिठावर मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी, राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, आनंद एंबडवार, ज्येष्ठ नेते विठ्ठल लोखंडकर, अनिल शिदोरे, वरोराचे रमेश राजूरकर, राजूराचे महालिंग कंठाळे प्रामुख्याने उपस्थित होते.

पोलिसांना पाणी द्या
सत्तेवर येण्यापूर्वी पोलिसांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले होते. सुटल्या का समस्या, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न आजही कायम असल्याचे सांगून कायदा व सुव्यवस्था राखणाºया पोलीस बांधवाची देखील सत्ताधाऱ्यांनी प्रतारणा केली, असे ठाकरे म्हणाले. ठाकरे यांचे भाषण सुरू असताना मनसेचे काही कार्यकर्ते सभास्थळी पाण्याच्या बॉटल वितरीत करीत होते. नेमका हाच धागा पकडून ठाकरे यांनी पाण्याच्या बॉटल आधी पोलीस बांधवांना द्या, अशा सुचना कार्यकर्त्यांना केल्या, तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.

Web Title: Maharashtra Election 2019 :The need for a competent opposition in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.