Maharashtra Election 2019 ; ‘गुन्हेगारीला राजकीय पाठबळ’ हाच यवतमाळच्या निवडणुकीचा केंद्रबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 06:00 AM2019-10-17T06:00:00+5:302019-10-17T06:00:07+5:30

वाढती गुन्हेगारी आणि गुन्हेगारी वर्तुळातील सदस्यांना सत्ताधाऱ्यांकडून गेली पाच वर्षे दिले गेलेले पाठबळ यावर ही निवडणूक काँग्रेसकडून केंद्रित केली जात आहे. काँग्रेसने लावून धरलेले हे मुद्दे जनतेलाही अपील होत आहेत. ही गुन्हेगारी मोडून काढण्याची ग्वाही काँग्रेसच्या उमेदवाराने दिली आहे. तर भाजप हे मुद्दे दुर्लक्षित करून पालकमंत्री म्हणून खेचून आणलेल्या विकास निधीवर जोर देताना दिसत आहे.

Maharashtra Election 2019 ; The 'political support for crime' is the focus of Yavatmal's election | Maharashtra Election 2019 ; ‘गुन्हेगारीला राजकीय पाठबळ’ हाच यवतमाळच्या निवडणुकीचा केंद्रबिंदू

Maharashtra Election 2019 ; ‘गुन्हेगारीला राजकीय पाठबळ’ हाच यवतमाळच्या निवडणुकीचा केंद्रबिंदू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळ विधानसभा मतदारसंघात राज्यमंत्री भाजपचे मदन येरावार, काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर आणि शिवसेना बंडखोर संतोष ढवळे यांच्यात तिरंगी सामना होण्याची चिन्हे आहेत.
भाजप यवतमाळ शहरासाठी कोट्यवधींचा विकास निधी आणल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात ही निवडणूक या मुद्यावर होताना दिसत नाही. वाढती गुन्हेगारी आणि गुन्हेगारी वर्तुळातील सदस्यांना सत्ताधाऱ्यांकडून गेली पाच वर्षे दिले गेलेले पाठबळ यावर ही निवडणूक काँग्रेसकडून केंद्रित केली जात आहे. काँग्रेसने लावून धरलेले हे मुद्दे जनतेलाही अपील होत आहेत. ही गुन्हेगारी मोडून काढण्याची ग्वाही काँग्रेसच्या उमेदवाराने दिली आहे. तर भाजप हे मुद्दे दुर्लक्षित करून पालकमंत्री म्हणून खेचून आणलेल्या विकास निधीवर जोर देताना दिसत आहे. शिवाय गुन्हेगारीच्या मुद्यावर भाजपकडून पलटवारही केला जात आहे.
शिवसेना बंडखोर नेमके कुणाला ‘मायनस’ करणार याबाबत तर्क लावले जात आहे. मात्र त्यातून सामाजिक मतांमध्ये फूट पडण्याचा धोका काँग्रेसला अधिक वाटतो. विकासाच्या नावाने सर्वत्र झालेले खोदकाम व त्यातून शहराचा विद्रूप झालेला चेहरा पाहता हा विकास भाजपवर बुमरँग होण्याची चिन्हे आहे.

जमेच्या बाजू


मदन येरावार
पालकमंत्री म्हणून यवतमाळ शहरासाठी खेचून आणलेला कोट्यवधींचा विकास निधी, ३०२ कोटींची अमृत योजना, नगरपरिषद, जिल्हा परिषदेतील सत्ता, लोकसभा निवडणुकीत युतीच्या उमेदवाराला ३७ हजार मतांची आघाडी, शासकीय यंत्रणेवरील पकड, शहरी मतदारसंघ असल्याने भाजपची हक्काची मते, प्रचंड आर्थिक सुबत्ता, काश्मिरातील रद्द केलेले ३७० कलम, मोदींच्या नावाने मिळणारी मते, आमदारकीचा अनुभव.

बाळासाहेब मांगुळकर
जिल्हा परिषदेत दोन वेळा उपाध्यक्ष, सभापती, त्यातून जनतेची कामे करताना ग्रामीण भागाशी जुळलेली नाळ, सर्व परिचित चेहरा, सामान्यांमध्ये असलेली आपुलकी, ग्रामीण भागात पक्षासोबतच स्वत:चे असलेले कार्यकर्त्यांचे नेटवर्क, दलित, अल्पसंख्यक, मागासवर्गीय व ओबीसींचे भक्कम पाठबळ, काँग्रेसचा नवा सामान्य चेहरा, जनतेच्या संपर्कात, काँग्रेसमध्ये कार्यकर्ता म्हणून घेतलेल परिश्रम, जनतेची सहानुभूती.

उणे बाजू


मदन येरावार


दोन उन्हाळे जाऊनही अद्याप न पोहोचलेले बेंबळाचे पाणी, विकासाच्या नावाने शहरभर सर्वत्र झालेले खोदकाम, त्यातून विद्रूप झालेले शहर, ठिकठिकाणी उखडलेले रस्ते, अवती-भोवती गुन्हेगारी जगतातील सदस्यांचा वावर, त्यांना सातत्याने दिले जाणारे राजकीय पाठबळ, त्यातून निर्माण झालेली जनतेची नाराजी, बिघडलेली प्रतिमा, दबावामुळे शासकीय यंत्रणेची नाराजी, जुन्या निष्ठावंत, प्रतिष्ठीतांनी साधलेला दुरावा.

बाळासाहेब मांगुळकर
जनतेच्या मनातील चेहरा असला तरी आर्थिक दृष्ट्या कमकुवत, लोकवर्गणी करण्याची वेळ, तब्बल २३ वर्षानंतर विधानसभेच्या आखाड्यात, शिवसेनेच्या बंडखोरामुळे सामाजिक मतांमध्ये होणारे विभाजन, आर्थिक दृष्ट्या भक्कम असलेल्या उमेदवाराचे आव्हान, आघाडीत अद्यापही दिसत नसलेली एकजूट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख गटाचा विरोधी सूर, त्यांची भाजपशी असलेली जवळीक, अल्पसंख्यकांमधील किंचित फूट.

Web Title: Maharashtra Election 2019 ; The 'political support for crime' is the focus of Yavatmal's election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.