महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 10:01 PM2018-10-01T22:01:48+5:302018-10-01T22:02:08+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीने स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा आयोजित केली आहे. या यात्रेचा शुभारंभ मंगळवारी सकाळी आझाद मैदानातील गांधी पुतळ््यापासून केला जाणार आहे. पदयात्रेत प्रत्येक जण श्रमदान करून स्वच्छतेबाबत जाणीव जागृती करणार आहे. यवतमाळात ही पदयात्रा सलग दहा किलोमीटर चालणार असल्याची माहिती भाजपा नेते, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी सोमवारी येथे पत्रपरिषदेत दिली.

Mahatma Gandhi Cleanliness Service Dialogue | महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा

महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा

Next
ठळक मुद्देपालकमंत्री : श्रमदानातून जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीने स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा आयोजित केली आहे. या यात्रेचा शुभारंभ मंगळवारी सकाळी आझाद मैदानातील गांधी पुतळ््यापासून केला जाणार आहे. पदयात्रेत प्रत्येक जण श्रमदान करून स्वच्छतेबाबत जाणीव जागृती करणार आहे. यवतमाळात ही पदयात्रा सलग दहा किलोमीटर चालणार असल्याची माहिती भाजपा नेते, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी सोमवारी येथे पत्रपरिषदेत दिली.
स्वच्छता सेवा पदयात्रा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. प्रत्येक महिन्याच्या रविवारी याचे नियोजन केले आहे. विधानसभा क्षेत्रनिहाय श्रमदान करून स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे. हा उपक्रम ३० जानेवारीपर्यंत राबविला जाणार आहे. जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा क्षेत्रात १५ या प्रमाणे १०५ पदयात्रा काढण्यात येणार आहे. याला खासदार व लोकसभा प्रभारी प्रमुख राहणार आहेत. शेवटची पदयात्रा संपूर्ण राज्यात ३० जानेवारीलाच काढली जाणार आहे. दिवसभरात किमान एक तास सफाई करून श्रमदान करणे अनिवार्य केले आहे. पदयात्रेसाठी १५० कार्यकर्त्यांची टीम राहणार आहे. पदयात्रेचे महिनानिहाय नियोजन केले असून आॅक्टोबरमध्ये चार, नोव्हेंबरमध्ये तीन, डिसेंबर महिन्यात पाच आणि जानेवारी महिन्यात तीन दिवस पदयात्रा काढली जाणार असल्याचे ना. येरावार यांनी सांगितले. पत्रपरिषदेला नगरसेवक नितीन गिरी आदी उपस्थित होते.

Web Title: Mahatma Gandhi Cleanliness Service Dialogue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.