वैभवनगरात महावंदना व धम्मदेसना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:10 AM2017-10-13T01:10:36+5:302017-10-13T01:10:51+5:30

येथील वैभवनगरातील त्रिरत्न बौद्ध विहारात महावंदना व धम्मदेसना समारोह घेण्यात आला. अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघनायक भदन्त सदानंद महाथेरो अध्यक्षस्थानी होते.

 Mahavandana and the Talmudasana in the Vaibhavnagar | वैभवनगरात महावंदना व धम्मदेसना

वैभवनगरात महावंदना व धम्मदेसना

Next
ठळक मुद्देवैभवनगरातील त्रिरत्न बौद्ध विहारात महावंदना व धम्मदेसना समारोह घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वैभवनगरातील त्रिरत्न बौद्ध विहारात महावंदना व धम्मदेसना समारोह घेण्यात आला. अखिल भारतीय भिक्खू संघाचे संघनायक भदन्त सदानंद महाथेरो अध्यक्षस्थानी होते. त्यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले.
एकतानगरातील रमाई सांस्कृतिक भवनातील बौद्ध विहारापासून त्रिरत्न बौद्ध विहारापर्यंत रॅली काढण्यात आली. याठिकाणी झालेल्या कार्यक्रमाला किशोर भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. भिक्खू संघाने धम्मदेसना दिली.
धम्मदेसना घेऊन त्याप्रमाणे जीवनात अंमल करा, जेणेकरून जीवनात आपल्याला दु:खावर मात करता येईल, असे भदन्त संघरत्न मानके यांनी यावेळी सांगितले. भदन्त सदानंद महाथेरो, भदन्त विपस्सी महाथेरो, भन्ते बोधी पाली यांच्या धम्मदेसना पार पडल्या. प्रास्ताविक रामदास वीर यांनी तर आभार सुजाता खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी दीपक ढोणे, चंद्रशेखर गुजर, कैलास इंगळे, विक्रम रंगारी, विलास कानंदे, विवेक वाघमारे, खोब्रागडे, सुभाष नगराळे, वासनिक, सचिन तलवारे, प्रमोद बारसे आदींनी पुढाकार घेतला.
सांस्कृतिक भवन, एकतानगर
यवतमाळ : वाघापूर परिसराच्या एकतानगरातील रमाई सांस्कृतिक भवनात वर्षावास समापन समारोह घेण्यात आला. भदन्त शीलरत्न यांनी आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन केले. धम्म ध्वजारोहण, अभिवादनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. वर्षा खडसे व चमूचे स्वागतगीत आणि बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदन्त राहुल बोधी होते. अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष महाथेरो भदन्त सदानंदजी यांनी मार्गदर्शन केले. भदन्त शीलरत्न, भदन्त रठ्ठपाल, भदन्त मेधनकर यांच्यासह आर्याजी कल्याणी व वैशाली यांनी धम्मदेसना दिली. फुले-शाहू साहित्य परिषदेचे अध्यक्ष किशोर भगत, वा.श. शिंगाडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. भीमज्योती चॅरिटेबल ट्रस्ट व धम्मज्योती महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रास्ताविक पायल मनवर यांनी, तर आभार जयश्री सोनोने यांनी मानले.

Web Title:  Mahavandana and the Talmudasana in the Vaibhavnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.