दिग्रस येथे महावीर जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 10:27 PM2018-03-29T22:27:38+5:302018-03-29T22:27:38+5:30
जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या २६१७ वा जन्मकल्याणक महोत्सव दिग्रस शहरात उत्साहात साजरा करण्यात आला.
ऑनलाईन लोकमत
दिग्रस : जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या २६१७ वा जन्मकल्याणक महोत्सव दिग्रस शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सकल जैन समाजाच्यावतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. भगवान महावीरांच्या जय जयकाराने आसमंत दणाणून गेला होता.
येथील चिंतामणी पार्श्वनाथ जैन मंदिरातून सकाळी ९ वाजता शोभायात्रेला प्रारंभ झाला. चिंतामणी रथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. भगवान महावीरांचा जय जयकार करीत शहराच्या प्रमुख मार्गांवरून ही शोभायात्रा काढण्यात आली. ठिकठिकाणी भाविकांसाठी थंडपेय व पाण्याची व्यवस्था केली होती.
या शोभायात्रेत माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख, माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे यांच्यासह शहरातील गणमान्य नागरिक, सकल जैन समाज बांधव, भगिनी सहभागी झाले होते. शहरातील जैन मंदिरावर रोषणाई व आकर्षक सजावट करण्यात आली होती. शहरातील जैन मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली होती. शोभायात्रेचा समारोप स्थानिक दत्त चौकातील चिंतामणी पार्श्वनाथ श्वेतांबर जैन मंदिरात झाला. यानिमित्त श्री बाबाजी महाराज जैन मंदिरात रक्तदान शिबिर व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यशस्वीतेसाठी श्री सकल जैन समाज व श्री संघाने परिश्रम घेतले.