मुख्याधिकार्यांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा
By admin | Published: May 31, 2014 12:13 AM2014-05-31T00:13:57+5:302014-05-31T00:13:57+5:30
दिग्रस नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांविरोधात नगरसेविकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा निषेध म्हणून कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले.
दिग्रस नगरपरिषद : कर्मचार्यांचे कामबंद
दिग्रस : दिग्रस नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांविरोधात नगरसेविकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा निषेध म्हणून कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. तर शिवसेनाही आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.
दिग्रस नगरपरिषदेत गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकात खडाजंगी झाली. मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून नऊ नगरसेवकांसह ५0 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले तर महिला नगरसेवकांनी विनयभंगाचा आरोप करीत मुख्याधिकार्यांविरोधात तक्रार दिली. सायंकाळी पोलिसांनी मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या विरोधात भादंवि ३५४ (अ), ५0९, २९४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी झालेल्या प्रकरणाचे शुक्रवारीही नगरपरिषदेत पडसाद पडले. मुख्याधिकार्यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीचा निषेध करीत कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन केले. तसेच तहसीलदारांना निवेदनही दिले. या प्रकरणी शिवसेनेने आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. (प्रतिनिधी)