‘अरुणावती’चा मुख्य उजवा कालवा फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 10:56 PM2017-11-19T22:56:06+5:302017-11-19T22:56:17+5:30
यावर्षी अत्यल्प पावसामुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न आतापासूनच भेडसावत असतानाच जिल्हा पातळीवर उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये यासाठी बैठका सुरू असतानाच.....
लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : यावर्षी अत्यल्प पावसामुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न आतापासूनच भेडसावत असतानाच जिल्हा पातळीवर उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये यासाठी बैठका सुरू असतानाच दुसरीकडे मात्र शेतकºयांच्या पिकासाठी अरुणावतीचा उजवा मुख्य कालवा सोडताना नियोजनाअभावी हा कालवा फुटून दर तासाला लाखो लिटर पाणी वाया गेले.
कार्यकारी अभियंता व संबंधित कर्मचाºयांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही घटना घडल्याचा आरोप होत आहे. अरुणावतीच्या उजव्या मुख्य कालव्यास साधारणत: चार ते पाच दिवसांपासून तूर, कापूस पिकांसाठी पाणी सोडण्यात येत आहे. पाणी सोडल्यानंतर संबंधित अधिकाºयांच्या भेटी त्या ठिकाणी आवश्यक आहे. परंतु याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. सकाळच्या सुमारास अचानक कालव्यात जास्त पाणी सोडण्यात आले. अशातच दुपारी ४ वाजता तुपटाकळी ते बेलुरा रोडवरील उजव्या मुख्य कालव्याला ५० फुटापर्यंत गायकी यांच्या शेताजवळ ओलावा फुटला. साधारणत: ६ वाजेपर्यंत कुणीही अधिकारी, कर्मचारी याकडे फिरकला नाही. पाणी वाया जात असताना शेतकरीवर्ग हतबलपणे केवळ पाहात होते. काही शेतकºयांनी तत्परतेने कार्यकारी अभियंता व इतर कर्मचाºयांना फोन लावले. परंतु सर्व कॉल संपर्क कक्षेच्या बाहेर येत होते. तहसीलदार किशोर बागडे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर काही प्रमाणात हालचालीला वेग आला. मागील वर्षीसुद्धा उजवा मुख्य कालवा लाख (रायाजी) गावाजवळ फुटला होता.
यावर्षी अरुणावती प्रकल्पात सध्या केवळ २३ टक्केच पाणीसाठा आहे. या मोजक्या पाणीसाठ्यातून शेतीला पाणी दिल्या जात आहे. अशा स्थितीत मुख्य उजवा कालवा फुटल्याने दुष्काळात तेरावा महिना आला आहे. कार्यकारी अभियंत्याच्या थोड्याशा दुर्लक्षितपणामुळे हा प्रसंग निर्माण झाला आहे, तर सहायक कार्यकारी अधिकारी यांचेही ढिसाळ नियोजन यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळेच आजपर्यंत शेताच्या शेवटच्या टोकाला पाणी पोहोचविण्यात संबंधित विभागाला अपयश आले आहे.
योग्य नियोजनाचा अभाव
मागील वर्षी १०० टक्के धरण भरूनही कालव्यांना मनमानी पाणी सोडण्यात आले होते. योग्य नियोजन नसल्यामुळे यावर्षी हरभरा पिकाला पाणी मिळू शकले नाही. लाखो लिटर पाणी काही वेळातच वाया गेले. एकीकडे पीक परिस्थिती वाईट असताना आणि येत्या उन्हाळ्यात तालुक्यात पिण्याच्या पाण्याचीही टंचाई भासण्याची शक्यता असताना अधिकारीवर्गाच्या अशा दुर्लक्षित धोरणामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.