वाघिणीचा बंदोबस्त १५ दिवसांत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 09:58 PM2018-11-01T21:58:34+5:302018-11-01T21:59:10+5:30

नरभक्षी वाघिणीचा बंदोबस्त १५ दिवसात करा, असे निर्देश खासदार भावना गवळी यांनी संबंधित प्रशासनाला दिले आहे. त्यांनी वाघग्रस्त भागातील नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना धीर दिला.

Make arrangements for waghee in 15 days | वाघिणीचा बंदोबस्त १५ दिवसांत करा

वाघिणीचा बंदोबस्त १५ दिवसांत करा

Next
ठळक मुद्देखासदारांचा अल्टीमेटम : मदतीसाठी वनमंत्र्यांना साकडे, वाघग्रस्त भागाला दोन दिवस भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नरभक्षी वाघिणीचा बंदोबस्त १५ दिवसात करा, असे निर्देश खासदार भावना गवळी यांनी संबंधित प्रशासनाला दिले आहे. त्यांनी वाघग्रस्त भागातील नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना धीर दिला. दरम्यान, सरकारने या भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी वनमंत्र्यांकडे केली आहे.
खासदार भावना गवळी यांनी राळेगाव, कळंब तालुक्यातील वाघिणीची दहशत असलेल्या अनेक गावांना भेट दिली. शेतकऱ्यांचे शेतात जाणे बंद झाल्याने पीक वाळले आहे. दिवसा दहा तास वीज देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी सुरू झाली नसल्याचे या भेटीदरम्यान दिसून आले. जागल बंद असल्याने इतर वन्य प्राण्यांनी पिके भुईसपाट केली आदी बाबी त्यांच्या या भेटीप्रसंगी पुढे आल्या. लोणी, सराटी, सखी, वरद, बंदर, सावरखेडा, चहांद, आठमुर्डी, भुलगड आदी गावांना भेटी देऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.
याप्रसंगी त्यांच्यासोबत शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, राळेगाव विधानसभा सहसंपर्क प्रमुख प्रवीण पांडे, राळेगाव तालुका प्रमुख विनोद काकडे, शहर प्रमुख राकेश राऊळकर, नगरसेवक शंकर गायधने, राळेगाव शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख वर्षा मोघे, उपतालुका प्रमुख विजय पाटील, विभाग प्रमुख सुरेंद्र भटकर, खुशाल वानखडे, शेषराव ताजने, बालाजी गारघाटे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख अमोल धोपेकर, अमोल राऊत, संदीप पेंदोर, डॉ. प्रसन्न रंगारी, राजू कोहरे उपस्थित होते.
तर ठिय्या आंदोलन
वाघिणीचा बंदोबस्त आणि शेतकऱ्यांना १५ दिवसात मदत न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा खासदार भावना गवळी यांनी दिला आहे. वाघग्रस्त भागातील शेतकºयांना हेक्टरी ५० हजारांची मदत, २४ तास वीज, मोफत धान्य पुरवठा, जंगलाशेजारील शेतीला १०० टक्के अनुदानावर सोलर फेन्सिंग, विना अट शौचालयाची निर्मिती आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. दरम्यान, लोणी येथे वनविभागाच्या कॅम्पवर खासदार गवळी यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. वाघिणीला जेरबंद करण्याच्या मोहिमेचा आढावा घेतला. यावेळी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, मुख्य वनसंरक्षक राऊरकर, उपवनसंरक्षक के.अभर्णा आदी उपस्थित होते.

Web Title: Make arrangements for waghee in 15 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.