आर्णीतील अत्याचाराची उच्चस्तरीय चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 10:23 PM2018-10-16T22:23:48+5:302018-10-16T22:24:19+5:30

आर्णीमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे मंगळवारी यवतमाळात पडसाद उमटले. सकल जैन समाज, माहेश्वरी समाज, अग्रवाल समाज, राजस्थानी ब्राम्हण समाज, अखिल भारतीय विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा काढण्यात आला.

Make a high-level inquiry into Arnie's atrocities | आर्णीतील अत्याचाराची उच्चस्तरीय चौकशी करा

आर्णीतील अत्याचाराची उच्चस्तरीय चौकशी करा

Next
ठळक मुद्देसकल जैन समाजाचा निषेध मोर्चा : नराधमांना फाशी द्या, महिलांनी नोंदविला रोष

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आर्णीमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे मंगळवारी यवतमाळात पडसाद उमटले. सकल जैन समाज, माहेश्वरी समाज, अग्रवाल समाज, राजस्थानी ब्राम्हण समाज, अखिल भारतीय विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी समाजबांधवानी काळ्या फिती लावून घटनेचा निषेध केला. नराधमांना फाशी देण्याची मागणी करणारे फलक युवती आणि महिलांनी उंचावले होते. अत्याचाराची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तपास महिला पोलिसांकडे सोपविण्याची विनंती जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधीक्षकांना करण्यात आली.
स्थानिक पाच कंदिल चौकातून निघालेला हा मोर्चा तिरंगा चौकात धडकला. येथे झालेल्या सभेत समाजबांधवांनी तीव्र शब्दात घटनेचा निषेध नोंदविला. अशा प्रकारच्या अत्याचाराची हिंमत कोणीही करू नये म्हणून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. आठ मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. यावेळी आंदोलकांनी संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करावी, संपूर्ण प्रकरणात आर्णी पोलिसांकडून दिरंगाई झाली आहे. या दिरंगाईला जबाबदार असणाऱ्या अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी. सामूहिक अत्याचार प्रकरणात असलेल्या कलमामध्ये दुरूस्ती करावी. अपराध्यांना जामीन मिळू नये. अल्पवयीन मुलांकडून अशा प्रकारचा अपराध घडला असेल तर बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद घेण्यात यावी. या प्रकरणात महिला डीवायएसपीची नियुक्ती करण्यात यावी. न्यायालयीन कामकाजात लागणारे दस्ताऐवज पीडित कुटुंबाला तत्काळ मिळावे आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले.

 

Web Title: Make a high-level inquiry into Arnie's atrocities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.