पिंपळगाव येथे तात्काळ दारूबंदी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 10:30 PM2018-07-28T22:30:39+5:302018-07-28T22:31:17+5:30
पिंपळगाव (रुईकर) येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारु निर्मिती आणि विक्री केली जात आहे. कळंब पोलिसांना माहिती देऊनही कारवाई केली जात नाही. त्यामुळे शनिवारी महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक देऊन निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : पिंपळगाव (रुईकर) येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारु निर्मिती आणि विक्री केली जात आहे. कळंब पोलिसांना माहिती देऊनही कारवाई केली जात नाही. त्यामुळे शनिवारी महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक देऊन निवेदन दिले.
पिंपळगाव (रुईकर) येथे मागील अनेक दिवसांपासून बिट जमादाराच्या आशीर्वादाने अवैध दारु विकली जात आहे. चौकाचौकात खुलेआम दारुचे अड्डे तयार झाले आहे. लहान मुले व महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दारुड्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वी या गावातील महिलांनी आमदार डॉ.अशोक उईके यांची भेट घेऊन दारुबंदीची मागणी केली. त्यानंतर आमदार उईके यांनी ठाणेदाराला विश्राम गृहावर बोलावून दारुबंदीचा अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर काही दिवस दारु बंद होती. आता जैसे-थे परिस्थिती आहे.
महिलांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून आपले गाऱ्हाणे मांडले. यावेळी मनीषा काटे, सरपंच सुनिता खडसे, उपसरपंच खुशाल पाटील, प्रशांत भोयर, शशिकला तेतरे, वंदना बारी, अंजू कुमरे, अनिता पिसाळकर, द्वारका कोरले, पुष्पा देशमातुरे, तारा चव्हाण, दुर्गा वाकले, मयुरी भोयर, आशा लांजेवार, रंजना वाकले, वैशाली रुईकर, कल्पना पिसाळकर, हर्षा पिसाळकर, माधुरी पिसाळकर, जोत्स्ना पिसाळकर, मीरा कुडमेथे, गोपीलाल पनपालीया आदी उपस्थित होते.