योग्य वेळ साधून संधीचे सोने करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 10:22 PM2019-07-05T22:22:27+5:302019-07-05T22:25:11+5:30
ध्येय निश्चित करून प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास यश प्राप्ती झाल्याशिवाय राहात नाही. विद्यार्थ्यांनी योग्य वेळ साधून संधीचे सोने करावे, असे प्रतिपादन आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : ध्येय निश्चित करून प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यास यश प्राप्ती झाल्याशिवाय राहात नाही. विद्यार्थ्यांनी योग्य वेळ साधून संधीचे सोने करावे, असे प्रतिपादन आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी केले.
येथील भीम टायगर सेनेतर्फे विश्रामगृहात तालुक्यातील दहावी आणि बारावीतील सर्व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी धाबे बोलत होते. बीडीओ शिवाजी गवई होते. पाहुणे म्हणून प्रकल्प अधिकारी धाबे, वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख रवींद्र भंडारे, डॉ.राजेश वाढवे, भीम टायगर सेनेचे यवतमाळ शहराध्यक्ष पंजाब कांबळे, जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष गीता कांबळे, समाधान केवटे, नरेंद्र पाटील, सय्यद मुजमोदीन, सय्यद सिदीकी, अॅड.आरीफ अहेमद, आकाश मुनेश्वर, प्रभाकर खंदारे, दत्ता कांबळे, राजकुमार पठाडे, महादेव चोपडे, एम.यू. बोरकर, अण्णा दोडके, संजय शेळके, गौतम खडसे उपस्थित होते.
प्रथम छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. बीडीओ गवई यांनी शाहू महाराजांनी आरक्षणाची तरतूद करून तळागाळातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. यानंतर सर्व समाजातील गुणवंतांना संविधानाची प्रत, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रा.प्रवीण राजहंस यांनी गीत सादर केले. संदीप पाल यांनी प्रबोधन केले. गणेश कांबळे यांची भीम टायगर सेनेच्या पुसद शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली.
संचालन प्रा.जनार्धन गजभिये यांनी केले. यशस्वीतेसाठी किशोर कांबळे व भीम टायगर सेनेच्या चमूने परिश्रम घेतले.