शेतमालासाठी गोडावून उपलब्ध करून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:47 AM2021-08-12T04:47:27+5:302021-08-12T04:47:27+5:30
जिल्हा अधिकाऱ्याकडे शेतकऱ्यांची कैफियत शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव महागाव : खरीप पिकांची काढणी करण्यासाठी केवळ दीड महिना शिल्लक आहे. शेतकऱ्यांना ...
जिल्हा अधिकाऱ्याकडे शेतकऱ्यांची कैफियत
शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
महागाव : खरीप पिकांची काढणी करण्यासाठी केवळ दीड महिना शिल्लक आहे. शेतकऱ्यांना तारण योजना व धान्य साठवणुकीसाठी गोडावून उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे. परंतु समितीकडून टोलवाटोलवी केली जात असल्याने शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन गोडावूनची मागणी केली.
विशेषत: सोयाबीनचे पीक लवकर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना गोडावूनची अत्यंत आवश्यकता आहे. बाजार समितीने कोटी रुपये खर्ची घालून गोडावून उभारले आहे. परंतु संबंधित कंत्राटदाराने हे गोडावून अद्याप बाजार समितीकडे हस्तांतरित केलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे. अखेर शेतकऱ्यांनी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे आपली व्यथा मांडली. मागील वर्षी पणन योजनेअंतर्गत बांधण्यात आलेले गोडावून यावर्षी तरी उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. जयंत चौधरी, असलम सुरैया, अमोल शिंदे, अनिल पाटे यांनी तहसीलदार नामदेव इसळकर यांच्या माध्यमातून हे निवेदन पाठविले.
कोट
बांधलेल्या गोडावूनचे आतील भागातील बरेच काम बाकी होते. आता पावसाचे पाणी शिरण्याची शक्यता असल्याने आम्ही ही कामे करून घेत आहोत. ते अंतिम टप्प्यात आहे. काम पूर्ण होताच शेतकऱ्यांना गोडावून उपलब्ध करून दिले जाईल.
- अभिजित गुगळे
सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती महागाव
100821\img_20210809_094635.jpg
कृषी उत्पन्न बाजार समितीने पणन योजनेअंतर्गत बांधकाम केलेले गोडाऊन