लहान भावाच्या तेरवीच्या दिवशी मोठ्याची आत्महत्या; कुटुंबावर कोसळले आभाळ

By विलास गावंडे | Published: September 2, 2022 05:17 PM2022-09-02T17:17:05+5:302022-09-02T17:22:15+5:30

नेरच्या बारीपुरा येथील घटना.

man commits suicide by jumping in a well १३ days after younger brother's death | लहान भावाच्या तेरवीच्या दिवशी मोठ्याची आत्महत्या; कुटुंबावर कोसळले आभाळ

लहान भावाच्या तेरवीच्या दिवशी मोठ्याची आत्महत्या; कुटुंबावर कोसळले आभाळ

Next

नेर (यवतमाळ) : लहान भावाच्या तेरवीच्या दिवशी मोठ्या भावाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी नेर येथे घडली. तेरवीसाठी आलेल्या नातेवाईकांना अंत्ययात्रेत सहभागी व्हावे लागले. विनायक कृष्णराव दुधे (५२), रा. बारीपुरा, नेर असे मृताचे नाव आहे. दोन्ही भावांच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचे आभाळच कोसळले आहे.

विनायकचा लहान भाऊ मिलिंद कृष्णराव दुधे (४७) याचा किडणीच्या आजाराने सावंगी मेघे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. शुक्रवारी मिलिंदची तेरवी होती. यासाठी नातेवाईकही आले होते. मात्र, सकाळी शेतात गेलेला मोठा भाऊ विनायक परत आला नाही.

नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. त्याच्याच शेतातील विहिरीत विनायकचा मृतदेह आढळला. विनायक याच्याकडे दीड एकर शेती आहे. पत्नी, मुलगा, तीन मुली असा त्याचा परिवार आहे. मिलिंदच्या तेरवीसाठी आलेल्या नातेवाईकांना विनायकच्या अंत्ययात्रेत सामिल व्हावो लागले.

Web Title: man commits suicide by jumping in a well १३ days after younger brother's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.